बॉलीवूड मधील कलाकारांचे लग्न सोहळा आणि त्या लग्न सोहळ्याला कोणकोणते कलाकार उपस्थिती लावतात. हे पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी अधिक उत्सुकतेचं ठरतं. बॉलीवूडमधील कलाकार हे अनेक विविध चित्रपटांमध्ये, जाहिराती यामधून मानधन मिळवत असतात. त्यामुळे या कलाकारांचे लग्नसोहळे कोणत्याही उत्सवापेक्षा कमी नसतात. पण बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या लग्नात कोणाला बोलावले नाही. पाहुयात कोण आहेत हे कलाकार

1. जॉन अब्राहम – बॉलीवूड मधील हँडसम हंक असलेला जॉन अब्राहमहा एक मॉडेल, सिने-अभिनेता व निर्माता आहे. २०१४ साली जॉनने प्रिया रुंचाल हिच्याशी लग्न केले. जॉन अब्राहमने खूप गुप्तपणे लग्न केले. जेव्हा त्यांने प्रियासोबत लग्न केले तेव्हा त्याने नुकतेच बॉलीवूडमध्ये पाऊल टाकले होते. त्यामुळे त्याने फार गुप्तपणे लग्न करत लॉस अँजेल्समध्ये लग्नाची पार्टी केली होती. इतकेच नव्हे तर त्याने त्याच्या लग्नविषयीची घोषणा देखील केली नाही.

2. राणी मुखर्जी – ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिने चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा यांच्यासोबत २०१४ मध्ये लग्न केले. परंतु यांच्या लग्नाला केवळ करण जौहर आणि वैभवी मर्चेंट हे उपस्थित होते. हजारो करोडोच्या संपत्तीचे मालक असणारे आदित्य चोप्रा यांच्या लग्नात केवळ २० लोक उपस्थित होते. यानंतर त्यांनी कोणतेही रेसेप्शन किंवा पार्टी दिली नव्हती.

3. सेलिना जेटली – माजी विश्वसुंदरी असलेल्या सेलिनाने २००१ साली फेमिना मिस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. तिने २००३ साली जानशीन ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०११ साली सेलिनाने तिचा प्रियकर पीटरहॉग याच्यासोबत लग्न केले. सेलिनाच्या लग्नात देखील तिने कोणाला बोलावले नव्हते. इतकेच नव्हे तर एक महिना होईपर्यंत आपलं लग्न झालं असल्याची माहिती देखील कोणाला दिली नव्हती.
4. कुणाल कपूर – कुणाल कपूर हा एक भारतीय अभिनेता, लेखक आणि उद्योजक आहे. जो हिंदी चित्रपटांमध्ये प्रामुख्याने काम करतो. तो क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्म केट्टोचा सह-संस्थापक आहे. कुणाल कपूरने अमिताभ बच्चन यांची भाची नैना बच्चनसोबत २०१५ साली लग्न केले. यांचे लग्न देखील फार गुप्तपणे झाले होते. फार कमी लोकांना या लग्नाचे आमंत्रण होते. या दाम्पत्याने लग्नानंतर दिल्ली येथे रिसेप्शन देखील दिले होते.

5. मनोज वाजपेयी – बॉलीवूडमधील एक उत्तम कलाकार असलेला मनोज वाजपेयी याने हिंदी सोबतच तेलुगू व तामिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००६ साली त्याने शबाना रझा यांच्याशी लग्न केले. इतर कोणी लग्नामध्ये येण्याचा तर विषयच सोडा, मनोज बाजपेयी यांच्या लग्नामध्ये त्यांचा आईबाबांना देखील यायला मिळाले नव्हते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *