असे म्हणतात की कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. तुम्ही कोणत्याही फिल्ड मध्ये काम करत असा जर तुम्ही तिथे बखूबी ने काम केले तर तिथे तुम्ही टॉप पोझिशन ला जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हीसुद्धा श्रीमंत होऊ शकाल. पैसा ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाची असते. फक्त तुम्हाला नीट कमवता आले पाहिजे.

जर तुम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायची इच्छा असल्यास समाज किंवा तुमच्या परिवारातील लोक तुमच्यावर हसतात. मजा उडवतात. मात्र या क्षेत्रात काम करून देखील भरपूर पैसा कमावता येतो. ह्यासाठी तुमच्यात काही टॅलेंट आणि थोडा वेगळेपणा असणे आवश्यक आहे.

मगाशी आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक फील्डमध्ये एक टॉप पोझिशन असते. वेटर बद्दल बोलायचे झाल्यास मुंबईतील ताज हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर चा पगार ऐकून तुम्ही खूप चकित होऊन जाल.

मुंबई हे असे शहर आहे जिथे लाखो लोक दररोज उराशी स्वप्न बाळगून येतात. यामुळेच मुंबईला स्वप्ननगरी असेही म्हटले जाते. येथे गरीबा पासून ते अतिश्रीमंत असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात. मुंबई तुम्हाला असे अनेक लोक पाहण्यास मिळतील जे त्यांच्या मेहनतीच्या आणि टॅलेंट च्या जोरावर सामान्य माणसांपासून श्रीमंत बनले आहे.

विदेशातून जेव्हा लोक भारतात येतात त्यावेळी त्यांची पहिली पसंती मुंबई असते. मुंबईत एकीकडे स्लम एरिया आहे जेथे भरपूर गरीबी पाहण्यास मिळते. तर दुसरीकडे अलिशान शहरे आहेत जेथे केवळ श्रीमंत माणसे राहतात. मुंबईतील श्रीमंतांची आवडती जागा म्हणजे ताज हॉटेल.

ताज हॉटेल हे मुंबईतील सुप्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलचे नाव केवळ मुंबई पुरतेच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक मोठ्या व्यक्ती येथे येऊन थांबतात, आराम करतात, जेवतात आणि मजा करतात. या हॉटेल ला तुम्ही श्रीमंतांचे हॉटेल देखील म्हणू शकता.

इथे मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीची किंमत सामान्य हॉटेल पेक्षा भरपूर जास्त असते. हे एक श्रीमंत किंवा रीच स्टेटस सिम्बॉल आहे असे म्हटल्यास हरकत नाही. येथे येणारे लोक दिवसाला लाखो रुपये खर्च करतात तर समजुन जा येथे काम करणाऱ्या लोकांची कमाई किती चांगली असेल.

ताज हॉटेल मध्ये काम करणाऱ्या वेटर मध्ये वेगळेपणा जाणवतो. जसे की शिक्षण, कम्युनिकेशन स्किल, त्यांचे इंग्लिश आणि त्यांचा स्वभाव. वेटर चे काम करण्यासाठी त्यांना अनेक इंटरव्यू मधून पास व्हावे लागते. तेव्हा कुठे जाऊन त्यांना तेथे नोकरीची संधी मिळते.या हॉटेलमध्ये काम करण्याचे स्वप्न अनेक जण पाळतात यामागील प्रमुख कारण म्हणजे येथे काम करून मिळणारा मोठा पगार.

आम्ही तुमची उत्सुकता शिगेला पोहचवत नाही. ताज हॉटेल मध्ये काम करणाऱ्या वेटरचा पगार १ लाख ३० हजार रुपयांपासून ते १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत असतो. एवढे पैसे लोक मोठ्या डिग्री मिळून देखील कमावत नाही. जे येथे वेटरचे काम करून मिळतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *