बॉलिवूड कलाकारांचे उच्च राहणीमान पाहता त्यांचे मानधन करोडोंच्या घरात असते हे आपल्याला स्पष्ट जाणवते. हे कलाकार प्रत्येक चित्रपटात काम करण्यासाठी करोड रुपये आकारतात शिवाय ते जाहिरातींवर मार्फत सुद्धा पैसे कमावतात. एखाद्या कलाकाराची प्रसिद्धी वाढली की त्याच्या प्रसिद्धीचा वापर चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी चॅनेल चे मालक करतात.
त्यासाठी चॅनलच्या रियालिटी शोमध्ये होस्ट म्हणून काही सुपरस्टार कलाकारांना घेतले जाते. टीआरपी वाढावा यासाठी चॅनल त्या कलाकारांना वाटेल तेवढा आकडा देण्यास तयार असतात. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मार्फत अशाच काही कलाकारांचे टीव्ही मालिकांमधील मानधन सांगणार आहे.
मागील काही वर्षे चित्रपटातील सुपरस्टार टीव्हीवर होस्ट करताना दिसतात व निर्मात्यांकडून त्याबदल्यात मोठी रक्कम घेतात. एकीकडे सलमान खान बिग बॉस करतो तर दुसरीकडे बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन कोण बनेगा करोडपती या रियालिटी शो द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.
1. अमिताभ बच्चन – कोण बनेगा करोडपती या प्रश्न उत्तराच्या खेळाच्या रियालिटी शोचे होस्टिंग खुद्द बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन करतात. सध्या अमिताभ बच्चन जास्त चित्रपट करत नसल्यामुळे कोण बनेगा करोडपती या रियालिटी शो मार्फत त्यांना टीव्ही वर दररोज पाहणे हे त्यांच्या फॅन्सना सुखावणारे असते. त्यामुळे आपसूकच या रिॲलिटी शोचा टीआरपी उच्च स्थानावर असतो.
हा शो सर्वसामान्य माणसांसाठी असल्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक माणसाशी आपुलकीने बोलणे व त्यांना मोठ्या प्लॅटफॉर्मवर भीती वाटणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काम बिग बी अगदी सहज रित्या पार पाडतात. बिग बींची प्रसिद्धी, तसेच त्यांच्या कामातील कौशल्यलता या सर्व गोष्टी लक्षात घेता या शोसाठी चॅनल अमिताभ बच्चन यांना एका एपिसोड साठी ३ ते ५ करोड रुपयांचे मानधन देतात.
2. शाहरुख खान – बॉलीवूडचा रोमँटिक हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान टेड टॉक या रियलिटी शो ला होस्ट करतो. हा शो सगळ्यात महागडा रियालिटी शो म्हणून ओळखला जातो. असे म्हटले जाते की या रियालिटी शोमध्ये काम करण्यासाठी शाहरुख खान प्रत्येक तासा गणिक पैसे आकारतो.
3. सलमान खान – बॉलिवूडचा भाईजान त्याचा प्रत्येक चित्रपट ईद या सणाच्या वेळी प्रदर्शित करतो. सर्वात शेवटी सलमान खानला दबंग 3 या चित्रपटात पाहिले गेले होते. चित्रपटांमधून करोडो रुपये कमावणारा सलमान खान टीव्ही इंडस्ट्रीत सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. इंडस्ट्रीमधील लोकप्रिय तसाच वा द ग्र स्त रियालिटी शो बिग बॉस चे सूत्रसंचालन सलमान खान कडे असते.
सध्या सलमान खान बिग बॉस सीजन १४ ची जय्यत तयारी करत आहे. या शोचे चाहाते सलमान खान शिवाय बिग बॉस ची कल्पनादेखील करू शकत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान बिग बॉसच्या प्रत्येक एपिसोडसाठी १६ करोड रुपये मानधन घेतो.
4. अमीर खान – बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेला अभिनेता आमिर खान चित्रपटांप्रमाणेच रियालिटी शो मध्ये सुद्धा परफेक्शनिस्ट आहे. समाजा वरील काळा पडदा उठवणारा व तेथे समृद्धी घडवून आणणाऱ्या सत्यमेव जयते या रियालिटी शोचे होस्टिंग आमिर खान करतो. २०१२ पासून आमिर खान सत्यमेव जयते या रियालिटी शोच्या सिझनचे होस्टिंग करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शोचा एक एपिसोड करण्यासाठी आमिर खान ३ करोड रुपये फी घेतो.
5. अक्षय कुमार – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या रियालिटी शोच्या ५ व्या सिझनचे होस्टिंग करत होता. असे म्हटले जाते की या शोसाठी अक्षय कुमार १.६५ करोड रुपये इतकी फि घ्यायचा. याशिवाय अक्षय कुमारने खतरो के खिलाडी या रियालिटी शोचे सुद्धा काही सीजन होस्ट केले आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !