हम आपके है कौन? या चित्रपटात माधुरी दीक्षितची बहीण व सलमान खानच्या वाहिनीचे पात्र निभावणारी अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. नुकताच रेणुका शहाणे यांनीआपला ५४ वाढदिवस साजरा केला. रेणुका शहाणे यांचा जन्म १९६६ मध्ये महाराष्ट्रात झाला. मराठी तसेच हिंदी भाषेतल्या चित्रपटांत व दूरचित्रवाणी कार्यक्रमांतून अभिनय करणार्‍या मराठी अभिनेत्री आहेत. दूरदर्शनवरील सुरभि (१९९३-२००१) या मालिकेतील सूत्रसंचालक म्हणून त्या पहिल्यांदा प्रकाश झोतात आल्या. ‘हाच सूनबाईचा भाऊ’ या मराठी चित्रपटाने त्यांच्या कारकीर्दीस सुरुवात झाली.
हल्लीच रेणुका शहाणे या आपला पती आशुतोष राणा यांच्या सोबत हिंदीतील सुप्रसिद्ध रियालिटी शो ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये आले होते. या शोमध्ये त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी सांगितले. आशुतोष राणा रेणुका शहाणे यांच्या लग्नाला १९ वर्ष झाली आहेत. या दोघांनी प्रेमविवाह केला आहे. त्यांच्या लग्नात रेणुका शहाणे यांनी सोनेरी व लाल रंगाचा आकर्षक लेहंगा परिधान केला होता. सोबतच सोन्याचे दागिने देखील परिधान केले होते व आशुतोष राणा यांनी सोनेरी रंगाची शेरवानी व फेटा असा वेष परिधान केला होता.
रेणुका शहाणे आशुतोष राणा यांच्या पेक्षा चार वर्षांनी मोठ्या आहेत. रेणुका शहाणे यांचा पहिला विवाह मराठी नाट्यलेखक आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी झाला. पण त्यांचा लवकरच घ ट स्फो ट झाला. त्यानंतर रेणुका यांच्या जीवनात आशुतोष यांनी पाऊल ठेवले. यांची प्रेमकथा अगदी रोमांचक आहे. पहिल्याच भेटीत बघताच क्षणी आशुतोष यांना रेणुका आवडल्या होत्या. चित्रपट निर्माते हंसल मेहता यांच्या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली. यांची भेट गायिका राजेश्वरी सचदेव यांनी करून दिली होती.

हे दोघे जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा आशुतोष राणा यांना रेणुका यांच्याबद्दल थोडीफार माहिती होती पण रेणुका शहाणे यांना आशुतोष यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. पहिल्याच भेटीत आशुतोष यांनी रेणुका शहाणेंना सांगितले की मी तुमचा मोठा चाहता आहे. रेणुका यांना हे ऐकून आनंद झाला. त्या दोघांची पुन्हा अनेक महिने भेट झाली नाही.
यानंतर त्या दोघांची दुसरी भेट दिग्दर्शक रवी राय यांच्या दिवाळी पार्टीमध्ये होणार होती परंतु, आशुतोष हे काही कारणास्तव गैरहजर राहिले. दुसऱ्या दिवशी आशुतोष राणा यांनी रेणुका शहाणेंना फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि इथूनच ते दोघे एकमेकांशी बोलू लागले. आशुतोष यांचं लिखाण अगदी सुंदर आहे. ते कविता लिहीत असल्याने आपल्या बोलण्याने त्यांनी रेणुका यांचे मन जिंकले.
आशुतोष चित्रपटांच्या शूटनंतर मोकळ्या वेळात रेणुका यांच्यासोबत बोलत असतं व आपल्या कविता ऐकवत असतं. अशाच रीतीने त्यांच प्रेम फुलत गेलं व ते लग्नबंधनात अडकले. आशुतोष आणि रेणुका यांना सत्येंद्र व शौर्यमान अशी दोन मुले आहेत. सोशल मीडियावर दोघे ही आपल्या मुलांसोबतचे फोटो शेअर करत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *