वेगवेगळ्या गोष्टी तसेच वेगवेगळे ट्रेंड फॉलो होण्याचा इंटरनेट हे अगदी हक्काचे ठिकाण आहे. इंटरनेटवर कधी काय कोणती गोष्ट कितपत व्हायरल होईल हे आपल्याला सांगता येत नाही. हल्ली एक नवा ट्रेंड सुरू आहे तो म्हणजे एक फोटो दाखवला जातो व त्या फोटो मध्ये लपलेला प्राणी व्यक्तीने शोधून काढायचा असतो. बुद्धीने चपळ व चाणाक्ष असलेले व्यक्ती फार पटकन असे खेळ पूर्ण करतात. चला तर मग पाहूया या फोटोमध्ये कोणता असा भयभीत प्राणी लपला आहे.
पाऊस व पाण्यामुळे अनेकदा चिखल तयार होतो. कधीकधी अशी काय एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतो की तिथे दलदल असल्याचे आपल्याला प्रतीत होते. मग या दंगलीमध्ये काही प्राणी स्वतःला अशा रीतीने लपवून घेतात की आपल्याला कळतच नाही की या चित्रामध्ये एखादा प्राणी देखील लपला आहे. वरील फोटो ट्विटरवर IFS संदीप त्रिपाठी यांनी शेअर केला आहे.

हा फोटो शेअर केल्यावर त्याच्या खालील कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिले आहे.” कोणी सांगू शकता का हा फोटो कशासंदर्भात आहे..” आता आपण आहे हा फोटो नीट निरखून पाहूया. कोणाला दिसला का यामध्ये लपलेला एक भयभीत प्राणी? नाही सापडला तर आपण पाहूया याच उत्तर काय आहे.

IFS संदीप त्रिपाठी यांनी या चित्रांमध्ये लपलेल्या गोष्टीबद्दल विचारले तेव्हा सगळेजण या फोटोमध्ये बघून विचार करू लागले, आणि प्रत्येकाने आपापल्या परीने त्या चित्रामध्ये कोणता प्राणी लपला आहे हे सांगितले. संदीप त्रिपाठी यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे हे आहे कि त्या फोटोमध्ये एक मगर लपलेली आहे.
त्या फोटो मधील चिखलामध्ये आपल्याला एक चमकणारी गोष्ट दिसते आहे. तिथे चमकणारी गोष्ट म्हणजे आहेत मगरीची डोळे. मगर नेहमी अशा रीतीने लपून राहतात व शिकार कधी येतं आहे याची वाट बघतात.
या निसर्गामध्ये निर्माण होणारे अनेक प्राणी हे दोन कारणांमुळे आजूबाजूच्या वातावरणात अगदी मिसळून जातात. पहिलं कारण म्हणजे आपली शिकार होण्यापासून वाचणे आणि दुसरे कारण म्हणजे शिकार पकडणे. मगरची त्वचा ही अशी असते की जणू ती चिखलात सामावून जाते. मगर ही नेहमी लपून हल्ला करते.

एकदा का शिकार यांच्याजवळ आली की एखाद्या कडाडणाऱ्या विजेच्या वेगाने पुढे सरसावून त्याची शिकारीला ते त्यांच्या जबड्यामध्ये घट्ट पकडतात. पाण्यामध्ये व जमिनीवर दोन्ही ठिकाणी मगरी राहतात. त्यामुळे कधी आपण नदी किंवा तलावाजवळ जाताना नेहमी सतर्क राहिले पाहिजे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *