प्रत्येक जण खूप शिकून आपल्याला चांगली नोकरी मिळावी या साठी अफाट मेहनत करत असतो. काहीजण शिक्षण घेत पोटासाठी नोकरी करत असतात आणि आपल्या स्वप्नांना उंच भरारी देण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकदा खूप मेहनत करून नोकरी मिळत असते तर कधी कधी वाटते कि जे एखाद्या सोप्या कामाचे कुणीतरी पैसे दिले तर बरं होईल अशी प्रत्येकाची इच्छा असते. अश्याच इच्छेला सत्यात उतरवण्याचे धाडस एका कंपनीने केले आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल !

नोकरीची गरज प्रत्येक व्यक्तीला असते. प्रत्येकाला जास्त पैसे कमवून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायच्या असतात परंतु जरा विचार करा, तुमच्या हाती अशी एखादी नोकरी लागली ज्यामध्ये तुमच्या खाण्याच्या बदल्यात ४० लाख रुपये (वार्षिक) मिळतील तर काय गंमत आहे.

हो, खरचं हे स्वप्न नाही सत्य आहे. स्कॉटलँडच्या एका बिस्किट निर्माता कंपनीने अश्याच एका नोकरीसाठी असे आवेदन अर्ज मागितले आहे. खरंतर, बिस्किट निर्माता कंपनी ‘बॉर्डर बिस्किट्स’ला स्वतःसाठी ‘मास्टर बिस्किटर’ची तलाश गरज आहे. एका वेबसाइटच्या माहिती नुसार ‘कंपनी बिस्किट चाखण्याच्या बदल्यात ४० हजार पौंड (अंदाजे ४० लाख रुपये) चे वार्षिक मानधन देईल.

इच्छुक गरजवंतांसाठी स्वाद आणि बिस्किट उत्पादनाही खोलवर माहिती तसेच ज्ञान असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर नेतृत्व कौशल्य व संवाद कला यामध्ये निपुण असणे अनिवार्य आहे. ग्राहकांशी चांगले संबंध कायम ठेवण्यासाठी उत्कृष्ट उपाय सांगणाऱ्या उमेदवारांना नोकरीत बढती दिली जाईल.

‘बॉर्डर बिस्किट्स’ चे व्यवस्थापक पॉल पार्किंसने सांगितले कि, हे कुणासाठी तरी आपले स्वप्न सत्यात आणण्यासाठी सुवर्ण संधी आहे. तसेच, कंपनी मधील ब्रँड प्रमुख सूजी कारलॉ सांगतात कि ‘कंपनी ग्राहकांना सर्वश्रेष्ठ स्वाद आणि गुणवत्ता पूर्ण बिस्किट देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. आपल्या या प्रतिबद्धतेवर अंमल ठेवण्यासाठी त्यांना नवीन ‘मास्टर बिस्किटर’ चा शोध आहे. या पदासाठी पाक कलाचे ज्ञान हवे सोबतच लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्याचे कौशल्य सुद्धा अंगी असणे आवश्यक आहे.

‘बॉर्डर बिस्किट्स’चे व्यवस्थापक पॉल पार्किंसने सांगितले कि आम्ही देशभरातील लोकांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत आणि उत्तम उमेदवारांना मुलाखतीला बोलावले जाईल. याच्या आधी सुद्धा असेच प्रक्रिया २०१९ मध्ये कँडबरीने काढले होते.

कंपनीला दुकानामध्ये येण्याच्या आधी उत्पादनाच्या नमूनेसाठी चार चॉकलेट टेस्टर्स यांचा शोध होता. आपणास सांगू इच्छितो कि ‘बॉर्डर बिस्किट्स’द्वारा काढली गेलेली हि जागा पूर्ण वेळ असेल आणि वर्षात ३५ दिवसांची सुट्टी सुद्धा मिळेल. या संधी साठी खाली दिलेल्या संकेत स्थळाला भेट द्या.
https://www.borderbiscuits.co.uk/about/work-with-us/

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *