चित्रपटांमध्ये काम करावे, मोठ्या पडद्यावर झळकावे अशी प्रत्येक मुलीची मनोमन इच्छा असते. अशातच जर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास सोने पे सुहागा म्हणता येईल कारण सलमान खान ला बॉलीवूड मधील गॉडफादर म्हटले जाते.

बॉलीवूड च्या भाईजान सोबत काम करण्याची संधी मिळाल्यास करियर सेट होते असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही सुवर्ण संधी मिळण्याची अनेक जण मनोमन इच्छा बाळगून असतात. अशातच इंडस्ट्रीमध्ये याला काही अपवाद देखील आहेत ज्यांनी चक्क सलमान खान सोबत काम करण्यास नकार दिला. आज आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी सलमान खान सोबत ची ऑफर नाकारली.

1. अमृता राव – नुकताच अभिनेत्री अमृता राव ने गोंडस बाळाला जन्म दिला. एकेकाळी अभिनेत्री अमृता राव बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. अमृताला सलमान खान सोबत प्रेम रतन धन पायो या चित्रपटांमध्ये एक भूमिका मिळाली होती. या चित्रपटात अमृताला सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारायची होती.

मात्र अमृता रावने असे करण्यास नकार दिला. अमृता बद्दल सांगायचे झाल्यास तिने बॉलिवूड सोबतच चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अमृत आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम केले होते. अमृताचा शाहिद कपूर सोबतचा विवाह चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. याशिवाय अमृताने मै हू ना, इश्क विश्क, ठाकरे , जॉली एल एल बी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.

2. ॲमी जॅक्सन – सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खानच्या किक या चित्रपटासाठी अभिनेत्री अॅमी जॅक्सनचे नाव निवडले गेले होते. मात्र काही कारणास्तव अॅमी ने सलमान खान सोबत चा हा चित्रपट नाकारला. असे म्हटले जाते की त्या काळात अॅमी जॅक्सन भरपूर व्यस्त होती. अॅमीने आतापर्यंत २.०, सिंग इज ब्लिंग, थेरी, एक दीवाना था, येवडू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.
3. परिणीती चोपडा – बॉलीवूड मधील बबली गर्ल आणि अभिनेत्री प्रियंका चोपडा ची बहीण परिणीती चोपडा देखील या यादीत सहभागी आहे. अभिनेत्री परिणीती चोपडा ला जॅकलीन फर्नांडिस च्या आधी किक या चित्रपटाची ऑफर मिळाली होती.

मात्र परिणीती चोपडा ने या चित्रपटात अभिनय करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. परिणीती चोपडा ने ईशकबाज, हसी तो फसी, गोलमाल अगेन, केसरी, शुद्ध देसी रोमान्स, मेरी प्यारी बिंदु यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

4. दीपिका पादुकोण – अभिनेत्री दीपिका पादुकोण ला बॉलिवूडची टॉप म्हणून ओळखले जाते. दीपिकाचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात. मात्र तुम्हाला माहित आहे का दीपिका पादुकोणने सलमान खानच्या जय हो, बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो, सुलतान यांसारख्या पाच चित्रपटांना नकार दिला होता.

दिपीकाने असे का केले यामागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही मात्र काही रिपोर्ट मधून मिळालेल्या माहितीनुसार तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिने या चित्रपटाला नकार दिला होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *