बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आ*त्म*ह*त्ये*ला आता चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे मात्र याप्रकरणी अजूनही कोणतेच निष्कर्ष लागलेले नाही. या प्रकरणात मुख्य आरोपी म्हटली जाणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती ला एन सी बी च्या अधिकाऱ्यांनी काही काळासाठी अटक केली होती. त्यानंतर एक महिन्याने तिची जेलमधून सुटका झाली.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणी मितू सिंह आणि प्रियांका सिंह यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. आता रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी रियाने ८ जून ला सुशांत चे घर का सोडले याप्रकरणी खुलासा केला आहे.

बहिणींनी डॉक्टरांचा सल्ला न घेता चुकीच्या रिसिप्ट दाखवून सुशांतला औषधे दिल्याचा आरोप रिया चक्रवर्ती ने सुशांतच्या बहिणींवर केला. तर मुंबई पोलीस आणि एक एफिडेविट फाईल केले होते. मुंबई मिरर ने दिलेल्या माहितीनुसार रिया चक्रवर्ती च्या वकिलांनी म्हणजेच सतीश मानशिंदे यांनी या प्रकरणी एक स्टेटमेंट दिले आहे.

ते म्हणाले की सुशांतच्या बहिणींना त्याची मानसिक हालत माहित असून देखील त्याला चुकीची औषधे दिली होती. सुशांत ची बहिण प्रियंका सिंहचे ८ जून २०२० ला सुशांत सोबत बोलणे झाले होते. सुशांतला ड्र’ग्सची लत लागली आहे आणि त्याच्यावर मुंबईत उपचार चालू आहेत याबद्दल सुशांतच्या परिवाराला माहीत होते.

रिया ने सुशांत चे घर का सोडले याबद्दल तिच्या वकिलांनी सांगितले की, सुशांत ला कमीत कमी पाच डॉक्टरांनी सल्ला दिला होता की तुझी मानसिक आरोग्य बिघडण्याचे कारण ड्र’ग्स आहे त्यामुळे जास्त ड्र’ग्सचे सेवन करू नकोस. मात्र सुशांतने त्यांचे काही ऐकले नाही यामुळे रियाने ८ सुशांतचे घर सोडले होते त्यानंतर एक आठवड्याने म्हणजेच १४ जून ला सुशांतने आ*त्म*ह*त्या केली.

सुशांत बद्दल सांगायचे झाल्यास त्याने टीव्ही इंडस्ट्री मधुन त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. सुशांत मूळचा बिहारचा होता. त्याची पवित्र रिश्ता ही मालिका भरपूर गाजली. त्यानंतर त्याने सोन चिडिया, एम एस धोनी, छीछोरे यांसारखे अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले. दिल बेचारा हा चित्रपटाचा शेवटचा चित्रपट ठरला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *