घोड्याची नाल घराच्या मुख्य दारात लावल्यास ती शुभ मानली जाते. याबाबत आख्यायिका आहे की ज्या घराच्या बाहेर घोड्याची नाल लावली आहे अशा घरात वाईट शक्‍ती प्रवेश करत नाही. वास्तुशास्त्रात देखील घोड्याच्या नाळीस शुभ मानले जाते. शिवाय त्यामुळे होणाऱ्या चांगल्या फायद्यांबाबत देखील यात सांगितले आहे.

घोड्याची नाल कुठल्या जागी लावावी – वास्तुशास्त्रानुसार घोड्याची नाल घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा घरातील लिविंग रूम च्या प्रवेशद्वाराजवळ लावणे फायदेकारक करू शकते. त्या व्यक्तींच्या घराचे प्रमुख दार उत्तरेला, उत्तर पश्चिम दिशेला किंवा पश्चिमेला असेल अशा व्यक्तींनी घोड्याची नाल प्रमुख दारावरच लावावी. घोड्याची नाल शनिवारी दारावर लावू नये ते अशुभ ठरते. त्यामुळे ती इतर कोणत्याही दिवशी लावा मात्र शनिवारी लावू नका.

घोड्याची नाल लावल्यामुळे हे फायदे होतात –
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार घराच्या दारासमोर घोड्याची नाल लावलेली असते. अशा घरांना कधीच कोणाची वाईट नजर लागत नाही. शिवाय घरात नेहमीच भरभराट होते.

शनीच्या प्रकोपापासून बचाव – घराच्या दारापाशी घोड्याची नाल लावल्यास शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचले जाऊ शकते. आणि आपल्यावर देवाची कृपा राहते. शनिदेवाला लोखंड धातू आणि काळा रंग खूप प्रिय आहे. त्यामुळे घराबाहेर घोड्याची नाल लावल्यास शनि देवाची दृष्टी घरावर पडत नाही.

धनधान्यात भरभराट होते – घोड्याच्या नाळीला धान्याच्या डब्यात ठेवल्यास शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की घोड्याची नाल लाल रंगाच्या कपड्यात लपेटून धान्याच्या डब्यात ठेवल्यास घरातील धनधान्य कधीच कमी होत नाही. शिवाय स्वयंपाक घर देखील अन्न पदार्थांनी भरलेले राहील.

पैशांमध्ये वाढ होईल – ज्योतिष शास्त्रानुसार काळ्या घोड्याच्या नाळे ला पैशांच्या तिजोरीत ठेवल्यास शुभ असते. असे केल्यास घरातील पैशात वाढ होते. तुम्ही शुक्रवारच्या दिवशी घोड्याची नाल लाल कपड्यात लपेटून तुमच्या घरातील तिजोरीत ठेवा. असे केल्यास तुमच्या घरात पैशांची कमी कधीच होणार नाहीत या उलट पैशांची भरभराट होईल.

नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहील – घरात घोड्याची नाल ठेवल्यास घराच्या आसपास नकारात्मक ऊर्जा फिरकत नाही. घरात नेहमी सुख शांती नांदते. या व्यतिरिक्त घरात घोड्याची नाल ठेवल्यास घरातील दुर्भाग्य नेहमी घरापासून दूर राहते.

विक्रीत वाढ – घरा व्यतिरिक्त घोड्याची नाल दुकानात जरी लावल्यास दुकानातील वस्तूंच्या विक्रीत वाढ होते. दुकानाच्या बाहेर घोड्याची नाल लावल्यास व्यापारात भरभराट होते. त्यामुळे दुकानाच्या बाहेर घोड्याचे नाल लावून फायदा अनुभवा.

कमेंट मध्ये जय शनिदेव असे लिहा. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *