वाढलेले वजन नेहमीच चिंतेचा विषय असतो. आधुनिकीकरणामुळे माणसाची बदलती जीवनशैली, शरीराची काळजी न घेता वेळेत योग्य त्या गोष्टी न करणे, यामुळे वाढत्या वजनाचे लोक शिकार होतात. यावर्षात अचानक उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे जगभर लॉकडाऊन करण्यात आले आणि लोकांना घराबाहेर पडण्यावर बंदी घातली. रोजचं चालणं, व्यायाम यांना देखील आळा बसला. त्यामुळे देखील अनेकांचे वजन वाढले आहे.

आता बऱ्यापैकी सर्व गोष्टी मार्गस्थ लागत आहेत. त्यामुळे लोकांचे वाढलेले वजन कमी करण्याकडे कल सुरु होईल. जास्त वजन वाढलं तर त्याचा अधिक त्रास त्या व्यक्तीला होतो. वजन कमी करण्यासाठी लोकं खूप प्रयत्न करतात पण तरीदेखील त्यांचे वजन कमी होत नाही.

अनेकदा वेगळा डाईट प्लॅन व व्यायाम करून देखील लोकांचे वजन कमी होत नाही; परंतु तुम्हाला माहित आहे का,  सकाळच्या आपल्या नित्यक्रमामध्ये थोडासा बदल केल्यास आपण आपले वजन कमी करू शकतात. आज आपण जाणून घेऊयात की कशाप्रकारे आपण सकाळच्या आपल्या नित्यक्रमामध्ये थोडासा बदल बदल करून वजन कमी करू शकतो.

सकाळचा नाश्ता – वजन कमी करण्यासाठी पौष्टिक खाद्यपदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. दिवसभरातील आपल्या सर्व प्रकारच्या आहारांपैकी सकाळचा नाश्ता हा फार महत्त्वाचा असतो. शिवाय नाश्ता पोट भरून करावा. सकाळच्या नाश्त्यामुळे चयापचयाची क्षमता वाढते. यामुळे दिवसभर शरीरातील कॅलरी घटण्यास मदत मिळते.

जास्त प्रोटीन असलेला नाश्ता केल्याने खूप काळापर्यंत आपल्याला भूक ही लागत नाही. त्यामुळे आपण जास्त काही खात नाही आणि आपले वजन कमी राहण्यास मदत होते. नाश्त्यामध्ये अन्नपदार्थांव्यतिरिक्त फळांचाही समावेश करावा. सोबत शरीराला प्रोटीनचा पुरवठा व्हावा यासाठी अंड्यातील पांढऱ्या भागाचे सेवन करावे.

भरपूर पाणी प्यावे – पाणी हे नेहमी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते, त्यामुळे भरपूर पाणी प्यायले पाहिजे. शरीर डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पिणे. पाण्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. यामुळे आपल्या शरीराची चयापचयाची क्षमता देखील वाढते.

शरीर हायड्रेट राहते आणि ऊर्जाही मिळते. दिवसभरातून कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यावे. गरम किंवा कोमट पाणी प्यायल्यास शरीराला सर्वाधिक फायदे मिळतील. यामुळे चरबी लवकर घटण्यास मदत मिळते.

व्यायाम – आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम फार महत्त्वाचा आहे. व्यायाम केल्यास शरीरातील कॅलरी कमी करण्यास आणि चरबी जलद गतीनं घटण्यासाठी मदत मिळेल. सकाळी व्यायाम केल्याने रक्तामधील शर्करेचे प्रमाण नॉर्मल राहण्यास मदत होते.

संशोधनातील माहितीनुसार, नियमित कमीत कमी ५५ मिनिटे व्यायाम करावा. व्यायामामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होते. शरीर सक्रीय असल्यास अतिरिक्त चरबी जमा होत नाही. यामुळे शरीर देखील हलके होते. मधुमेह असलेल्या लोकांनी सकाळी व्यायाम नक्की करावा.

पुरेशी झोप – लठ्ठपणा आणि झोपेचा गहन संबंध आहे जे लोक रात्री झोपत नाहीत किंवा ज्यांची योग्य प्रकारे झोप न झाल्याने शरीरातील हार्मोनल बदलांमुळे लठ्ठपणाची समस्या वाढत जाते. कारण जे लोक जास्त काळ जागे राहतात, ते काहीतरी खातं पित असतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराचे वजन वाढते, म्हणून जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर पुरेशी झोप घ्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *