थंडीचा हंगाम सुरू झाल्यावर सर्दी पडस्या सारखे आजार डोकं वर काढतात. वातावरणात बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर देखील दिसून येतो. यामध्ये पोट दुखी, सर्दी खोकला, वायरल इन्फेक्शन यांचा समावेश असतो. या पासून बचावासाठी जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात तर तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. या हंगामात मनुका खाल्ल्यास गुणकारी ठरतो.
मनुका मध्ये अनेक आयुर्वेदिक गुण असतात. द्राक्ष सुकवून मनुके तयार केले जातात. मनुके गुणधर्माने गरम असल्यामुळे थंडीच्या दिवसात ते आपले शरीर गरम ठेवण्यास मदत करते. तसेच आपल्याला सर्दी पडसे किंवा कोणतेही व्हायरल आजार यांपासून दूर ठेवतात.
मनुक्या मध्ये फायबर, फाइटो न्यूट्रिएंट्स , आणि एंटीऑक्सीडेंट व्यतिरिक्त विटामिन ई, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम, आयरन, कॅल्शियम ,फॉस्फरस ,पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखे घटक मोठ्या प्रमाणात असतात. मनुका आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असतो. मनुक्याचा स्वाद जसा उत्तम असतो त्याचप्रमाणे तो फायदेशीर सुद्धा असतो. चला तर जाणून घेऊ मनुका आरोग्यासाठी कसा फायदेशीर असतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असल्यास मनुक्याचे सेवन करा – कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी असे सल्ले डॉक्टरांसह इतर सर्वच देत होते. त्यासाठी विविध काढे, महागडी औषधे ,वेगवेगळे डायट लोक घेत होते. मात्र शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असल्यास मनुके देखील फायदेशीर ठरतात. थंडीच्या दिवसात सर्दी खोकला यांसारख्या वायरल आजारांमुळे अनेक लोक त्रस्त असतात. यासाठी तुम्ही मनुक्याचे सेवन करा. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेलच शिवाय तुम्ही तंदुरुस्त देखील रहाल. यासाठी तुम्हाला दिवसातून केवळ पाच मनुक्यांचे त्यांचे सेवन करायचे आहे.
सर्दी-पडसे होऊ नये यासाठी मनुक्याचे सेवन करा – मनुक्यांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. याचा उपयोग सर्दी-पडसे नियंत्रित करण्यासाठी होतो. थंडीच्या दिवसात सर्दी होण्याचे प्रमाण जास्त असते. शिवाय काही वेळेस जास्त थंड पदार्थांचे सेवन केल्यास सर्दी होते. यासाठी रोज दिवसाला पाच मनुके दुधात उकळून ते दूध प्या. मनुक्यातील बिया काढायला विसरू नका.
शरीरात रक्ताची कमी असल्यास मनूक्यामुळे ती भरून निघते – महिलांमध्ये न्यूट्रिशियन ची कमी असल्यामुळे त्यांना एनिमिया सारख्या आजारावर होतो. एनिमिया सारख्या आजारापासून वाचण्यासाठी मनुक्यांचे सेवन करावे. मनुक्या मध्ये कॉपर चे प्रमाण जास्त असते जे शरीरातील रेड ब्लड सेल्स तयार करण्यास मदत करते.
दात मजबूत करतात – दात मजबूत करण्यासाठी तसेच निरोगी ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या टूथपेस्ट चा वापर करतो. किंवा डेंटिस्टकडच्या महागड्या ट्रीटमेंट्स घेतात. याबद्दल दात निरोगी ठेवण्यासाठी मनुक्याचे सेवन करावे. मनूक्यांमध्ये ओलेक्नोलिक ॲसिड असते. हे हे दात खराब होण्यापासून वाचवतात. सोबतच दातातील कॅव्हिटी सुद्धा दूर करतात. मनुका बॅक्टेरिया पासून रक्षण करतो.
कफ आणि ऍसिडिटी पासून सुटका – कफ आणि ऍसिडिटी झाली की छातीत खूप दुखायला लागते. काही वेळेस बोलायला देखील जमत नाही. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी पाच मनुके खाल्ल्यास कफ आणि गॅस पासून राहत मिळते. मनुक्या मध्ये फायबर चे गुण असतात. जे कफ आणि ऍसिडिटी साठी उपयुक्त ठरतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !