झोपण्यापूर्वी नाभीला मसाज करा मोहरीच्या तेलाचा, होतील हे जबरदस्त फायदे !

383

मोहरीच्या तेलाचा वापर आपण बहुतेकदा जेवणामध्ये करतो. मात्र याच मोहरीच्या तेलाचा वापर कधी शारीरिक फायद्यासाठी देखील होतो हे तुम्हाला माहीत आहे का? शरीराच्या इतर अवयवांसोबतच पोटावरील नाभी हादेखील शरीराचाच एक भाग आहे. लोक नाभी मध्ये तेल लावतात. नाभी ला तेल लावल्यामुळे अनेक फायदे होतात.

रोज रात्री झोपण्यापूर्वी तेलाचे दोन थेंब नाभीमध्ये टाकल्यास आपल्या आरोग्यास त्याचा फायदा होतो. नाभी मध्ये तेल लावल्यामुळे डोळे त्वचा आणि पोटासंबंधी फायदे असतात. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीला तेल लावून झोपा. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला नाभीमध्ये तेल लावून झोपल्यास काय फायदे होतात ते सांगणार आहोत.

हार्मोन्सचे संतुलन राहते – मासिक पाळी दरम्यान किंवा गर्भावस्थेत महिलांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये अनेक बदल घडून येतात. यामुळे महिलांच्या स्वभावात तसेच शरीरात बदल घडून येतात. त्यामुळे हार्मोन्स असंतुलित झाल्यावर नाभीमध्ये मोहरीचे तेल लावल्यास असंतुलित हार्मोन्स संतुलित होण्यास मदत होते.

ओठ मऊ होतात – ओठांना भेगा पडल्यास आपल्या चेहऱ्याचा लुक बिघडतो. शिवाय भेगा पडलेले ओठ भरपूर झोंबतात. नाभी मध्ये तेल लावल्यावर भेगा पडलेले ओठ एकदम मुलायम होतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये मोहरीचे तेल लावल्यास भेगा पडलेल्या ओठांची समस्या दूर होईल याशिवाय तुमचे ओठ मऊ आणि गुलाबी होतील.

चेहऱ्यावरील तेज वाढते – चेहरा तजेलदार असेल तर एक अति सुंदर दिसते. चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या महागड्या क्रीम्स आणि पावडर उपलब्ध आहेत. मात्र या सर्व गोष्टी विकत घेण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी घरगुती उपाय करून चेहऱ्यावर तेज आणू शकता.

यासाठी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये मोहरीचे तेल लावायचे आहे. असे केल्यास तुमच्या चेहऱ्यावर तेज येते आणि तुमचा चेहरा चांगला उजळतो. फक्त एवढेच नाही तर यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा डाग देखील नाहीसे होतात.

वेदनाशामक म्हणून उत्तम – तुम्हाला सांधेदुखी होत असल्यास मोहरीच्या तेलाने मालिश करावी यामुळे साध्या मधील दुखणे कमी होते याशिवाय मोहरीचे तेल अंतर्गत वेदनांपासून ही आराम देते.

भूक वाढवण्यासाठी मदत करते – जर तुम्हाला भूक जास्त लागत नसेल तर तुमची तब्येत ढासळू शकते. भूक लागण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर ठरेल. हे तेल पोटात एपीटायझर म्हणून काम करते ज्यामुळे भूक वाढण्यास मदत होते.

अस्थमा पासून आराम मिळतो – अस्थमा असलेल्या लोकांना मोहरीचे तेल अतिशय गुणकारी आहे. मोहरीच्या तेलात मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते – मोहरीच्या तेलात शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याचे गुण असतात. घरातील कमजोरी मोहरीच्या तेलाचा नियमित सेवनामुळे दूर होते. या तेलाने मालिश करणे देखील फायदेशीर ठरू शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !