घरात सुख शांती लाभ नसेल तर घराला घरपण येत नाही. सुख शांती हे पैशांवर सुद्धा अवलंबून असते. घरात अठराविश्वे दारिद्र्य असेल तर कोणते ना कोणते टेन्शन हे डोक्याला असतेच. त्यामुळे घराची भरभराट होणे आवश्यक असते. अनेक लोक असे आहेत जे कर्जाच्या डोंगरात बुडाले आहेत. अशा लोकांसाठी आम्ही आज काही उपाय सांगणार आहोत.

हे घरगुती उपाय दिवाळीच्या दिवसात केल्यास तुम्हाला तुमच्या कर्जातून मुक्ती मिळेल आणि पैशां संबंधीच्या समस्या कमी होतील. दिवाळीच्या दिवसात देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण केले जाते. तसेच घरात नवीन झाडू आणले जाते व एक झाडू मंदिरात दान दिले जाते. या दोन गोष्टी सर्रास सगळ्यांच्या घरात घडत असतील. मात्र आता आम्ही तुम्हाला अजून काही उपाय सांगणार आहोत.

चांदीचा हत्ती – असे म्हटले जाते की विष्णू आणि लक्ष्मीला हत्ती प्रिय असतो त्यामुळे घरात हत्तीची चांदीची मूर्ती ठेवावी. मूर्ती आतून पोकळ असू नये. मूर्तीचा आकार तुमच्या मनाने घ्यावा. हत्तीची चांदीची मूर्ती घरात ठेवल्यामुळे घरात शांती लाभते तसेच ही मूर्ती राहूच्या वाईट परिणाम पासून घराचे रक्षण करते.

कवड्या – पिवळ्या कवडीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. पांढ-या रंगाच्या कवड्या केशर किंवा हळदीत घोळून त्या लाल कपड्यात बांधून घरातील तिजोरीत ठेवून द्या. या कवड्या घरातील धनलक्ष्मीचे संरक्षण करतात.

चांदीची गढवी – चांदीच्या एका छोट्या भांड्यात दहा-बारा तांबे, चांदणी, पितळ किंवा कांस्य यांची नाणी राहू शकतील असे भांडे यालाच गढवी असे म्हणतात. हे भांडे घराच्या तिजोरीत सुरक्षित जागी ठेवल्यास धन आणि समृद्धी वाढते. दिवाळीच्या पूजेत या भांड्याची देखील पूजा केली जाते.

मंगल कलश – एका तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यामध्ये आंब्याची डाळी (पाने) घालून त्याच्यावरती नारळ ठेवावा. त्या कलशावर स्वस्तिकाचे चिन्ह काढावे. नारळावर एक फुल ठेवावे. यालाच मंगल कलश असे म्हणतात. लक्ष्मीदेवीच्या पूजेत या कलशाचा वापर केला जातो.

सात मुखी दिवा – देवी लक्ष्मीची कृपा सतत आपल्या घरात राहावी यासाठी सात मुखी दिवा लावावा. या दिव्यात दिवे जळताना ते तुपाचे असावेत. दिवाळीच्या दिवसात असा दिवा आवश्य लावावा. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी च्या समोर नऊ वाती असलेला तुपातील दिवा लावल्यामुळे घरात लवकर धनलाभ मिळतो तसेच आर्थिक समस्या दूर होतात.

रांगोळी – रांगोळी काढणे हा प्रकार सध्या जरी फक्त दिवाळी पुरताच मर्यादित असला तरी जुन्या परंपरेनुसार काही भागात अजूनही दारात चौकात किंवा कुठल्या मंगल समयी आणि देवी लक्ष्मीच्या पूजेला रांगोळी काढली जाते.

दिवे – दिवाळीच्या दिवसात रात्री घरात आणि घराच्या आसपास विशिष्ट ठिकाणी दिवे लावा. असे म्हटले जाते की दिवाळीच्या दिवसात रात्री देवळात गाईच्या दुधा मार्फत बनवलेले शुद्ध तुपाचे दिवे लावावेत यामुळे लगेच आपली कर्जातून मुक्तता होते आणि आर्थिक समस्या दूर होतात. दिवाळीच्या रात्री दुसरा दिवा लक्ष्मी पूजेच्या वेळी लावा, तिसरा दिवा तुळशीच्या समोर, चौथा दरवाजाच्या बाहेर, पाचवा वडाच्या झाडाखाली ठेवावा, सहावा दिवा कुठल्याही एका मंदिरात सातवा दिवा तेथे कचरा ठेवतो त्या ठिकाणी आठवा दिवा बाथरूम मध्ये नऊवा दिवा भिंतीवर दहावा दिवा खिडकीवर अकरावा दिवा घराच्या छतावर आणि बारावा दिवा घराच्या अंगणात ठेवावा. दिवाळीला कुलदैवते समोर, यम आणि आपल्या पित्रांसमोर सुद्धा दिवे लावतात.

मंत्र – देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पुढील मंत्राचा १०८ वेळा जप करावा. ऊं पहिनी पक्षनेत्री पक्षमना लक्ष्मी दाहिनी वाच्छा भूत-प्रेत सर्वशत्रु हारिणी दर्जन मोहिनी रिद्धि सिद्धि कुरु-कुरु-स्वाहा.

लक्ष्मी भोग – देवी लक्ष्मीला मखना, सिंघाडा बत्ताशे, हलवा, खीर ,डाळिंब , पांढऱ्या, आणि पिवळ्या रंगाच्या मिठाई, केशर भात आवडतो. ११ शुक्रवार जे लक्ष्मी देवीच्या मंदिरात लाल फुल अर्पण करून हा भोग चढवतात त्यांच्या घरात नेहमी शांती राहते. त्यांच्या घरात कुठल्याही प्रकारची पैशांची कमी राहत नाही. पूजेच्या वेळी १६ प्रकारच्या करंजा, पापडी, अनारसे, लाडू अर्पण करावेत.

पूजेची थाळी – देवी लक्ष्मी च्या पूजेला गोमती चक्र पूजेची थाळीत ठेवून देवीची पूजा केली जाते. पूजेनंतर गोमती चक्र तिजोरीत ठेवल्यास धन वाढते. तसेच हळकुंड, पिवळ्या कवड्या, एकाक्षी नारळ पूजेच्या ठेवून पूजा करावी नंतर या सर्व गोष्टी तिजोरी ठेवाव्यात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *