मनावरील दडपण कमी करण्यासाठी किंवा मोकळ्या वेळेत छंद म्हणून लोक गाणी ऐकणे पसंत करतात. इंडस्ट्रीमध्ये सध्या अनेक मातब्बर गायक आहेत. मात्र कोकिळे सारखा आवाज लाभलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची सर कोणाला नाही. परंतु लता मंगेशकर यांच्या तोडीस तोड आवाज गायिका अनुराधा पौडवाल यांचा देखील होता.

अनुराधा पौडवाल यांच्या आवाजाचे चाहते देशाविदेशातील सर्वसामान्य लोक तर होतेच परंतु त्यांच्यासोबत मोठमोठे निर्माता-दिग्दर्शकही होते. बॉलीवूड वर स्वतःच्या आवाजाची मोहिनी घालणाऱ्या अनुराधा पौडवाल यांनी त्यांच्या आयुष्यात एक मोठा निर्णय घेतला आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. अनुराधा पौडवाल यांचा जन्म २७ ऑक्टोबर,१९५४ मध्ये झाला. आता त्या ६६ वर्षांच्या झाल्या आहेत.

अनुराधा पौडवाल यांनी त्यांच्या संगीत विश्वातील करिअरची सुरुवात अमिताभ बच्चन यांचा चित्रपट अभिमान पासून केली होती. या चित्रपटात त्यांनी गायलेला श्लोक इतका प्रसिद्ध झाला की त्या रातोरात स्टार बनल्या.

त्यानंतर अनुराधा यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, आणि जयदेव यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम केले. अनुराधा पौडवाल यांना केवळ बॉलीवुड गाण्यांसाठी नव्हे तर भक्तिगीत यांसाठी देखील ओळखले जायचे.

अनुराधा यांचे करिअर इतक्या वेगाने पुढे जात होते की त्यांच्या समोर कोणी टिकत नव्हते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकदा संगीतकार ओपी नायर यांनी अनुराधा यांना म्हटले होते की आता तुमच्यासाठी लता मंगेशकरांना सुद्धा रिप्लेस करावे लागेल.

इतकेच नव्हे तर टी सिरीजच्या गुलशन कुमारांनी अनुराधा पौडवाल यांना नव्या जमान्याची लता मंगेशकर अशी उपमा दिली होती. त्याकाळी टी सिरीज ही एक मोठी कंपनी होती आणि अनुराधा यांनी या कंपनीसाठी शेकडो गाणी गायली होती.

१९९० मध्ये अनुराधा पौडवाल यांच्या पतीचे निधन झाले. या घटनेमुळे त्या भरपूर खचून गेल्या. त्यानंतर त्यांनी फक्त टी सिरीज साठी गीत गाणार असा निर्णय घेतला. त्यांच्या अशा एकाकी निर्णयामुळे त्यांचे करिअर ढासळत गेले आणि त्या संगीत विश्वापासून दूर होत गेल्या.

अनुराधा पौडवाल यांच्या या निर्णयामुळे बाकी सिंगर्सना इतर कंपन्यांमध्ये गायच्या संधी मिळाल्या. सध्या संगीत प्रधान चित्रपट मिळत नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते. त्यांना भक्तिसंगितातच आनंद मिळतो असे देखील त्या म्हणाल्या.

काही दिवसापूर्वी त्यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचा मृत्यू झाला त्यामुळे त्या आणखीनच खचल्या आहेत. या सर्व दुःखांवर मात करून, आम्ही अपेक्षा करतो कि त्या लवकर आपल्या त्यांच्या मधुर आवाजात आपले मनोरंजन करण्यासाठी सज्ज होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *