जगावर आ’क’स्मि’क आलेल्या या कोरोनाच्या संकटामुळे देशभरात व जगात या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संस्था आणि रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन काही प्रतिबंधात्मक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामध्ये हात साबण किंवा हँडवॉशने स्वच्छ धुणे किंवा सॅनिटाइझ करणे, मास्क लावणे व सोशल डिस्टंसिंग राखणे या गोष्टी समाविष्ट आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे मास्क व सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते आहे. घरात असताना आपण साबण किंवा हँडवॉशने हात स्वच्छ करतो. पण आता हळू हळू सगळ्या गोष्टी पूर्ववत होण्याच्या मार्गावर असताना ऑफिस देखील सुरु झाले आहेत, त्यामुळे घराबाहेर पडणारी लोक हि सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत. घरात असताना आपण साबण किंवा हँडवॉशने हात स्वच्छ करतो.
पण आता हळू हळू सगळ्या गोष्टी पूर्ववत होण्याच्या मार्गावर असताना ऑफिस देखील सुरु झाले आहेत, त्यामुळे घराबाहेर पडणारी लोक हि सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत. सॅनिटायझरशी संबंधित त्याचे फायदे तोटे न समजून घेता लोक सर्रास त्याचा वापर करत आहेत.
सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल असल्याने ते आग किंवा इलेक्ट्रिसिटी संबंधित उपकरणांपासून लांब ठेवणे आव्यश्यक असते. यासंबंधित काही घटना सुद्धा घडलया आहेत. त्यामुळे सॅनिटायझरचा सांभाळून वापर करावा. सॅनिटायझर बद्दल आम्ही पूर्ण माहिती आम्ही आपल्याकडे आणली आहे. चला तर मग जाणून घेऊयात !
कोणत्या सॅनिटायझरचा वापर करावा ? – कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसून २० सेकंदापर्यंत आपले हात स्वच्छ पाण्याने धुण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने हात स्वच्छ करण्यासाठी लोकांनी ६०% अल्कोहोल असलेले सॅनिटायझर म्हणजेच अल्कोहोल बेस्ड हॅन्ड सॅनिटायझर वापरावे असे सेंटर्स फॉर डीसीस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन यांनी सूचित केले आहे.
सॅनिटायझरपासून धोका? – वर नमूद केल्याप्रमाणे सॅनिटायझरमध्ये ६०% अल्कोहोल असते. इतक्या प्रमाणात अल्कोहोल असल्याने ते सॅनिटायझर ज्वलनशील असते, म्हणजे ते लगेच आग पकडू शकते. त्यामुळे सॅनिटायझर हे ज्वलनशील गोष्टींपासून लांब ठेवावे असा डॉक्टर सल्ला देतात.
सॅनिटायझरचा कसा कराल वापर? – सॅनिटायझर नेहमी कोरड्या हातांवर घेऊन लावावे, कारण सॅनिटायझरमधील अल्कोहोल हे हात कोरडे असतानांच काम करते, त्यामुळे सॅनिटायझर हाताला लावताना हात कोरडे असतील याची काळजी घ्यावी. सॅनिटायझरचे २ ते ३ थेम्ब हातावर घ्यावेत ते बोटांच्या मध्ये, हाताच्या मागच्या बाजूला नीट लावावे. सॅनिटायझर लावल्यावर हात कोरडा होईपर्यंत हात धुवू ही नका किंवा कपड्याला पुसू देखील नका.
सॅनिटायझरपेक्षा साबण उत्तम – जिथे पाणी व हँडवॉशचा वापर करू शकत नाही फक्त अशाच ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करावा. घरात असताना देखील ४ ते ५ वेळा साबण किंवा हँडवॉश लावून हात स्वच्छ धुवावे. घराच्या बाहेर असताना सॅनिटायझरचा वापर करावा.
हॉपकिंस युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार कोरोनाच्या काळात सॅनिटायझर हे साबणाच्या तुलनेत तितके प्रभावी नसल्याचे सांगितले आहे. कोरोनासोबत लढण्यासाठी तेच सॅनिटायझर उपयोगी पडेल ज्या सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असेल.
हातावरील सॅनिटायझरचा प्रभाव – नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील पूर्व विभागाध्यक्ष असलेले डॉक्टर के श्रीनाथ रेड्डी आणि दिलेल्या माहितीनुसार सॅनिटायझर हे अल्कोहोल बेस्ड असते. आपण शिंकलो किंवा खोकलो आणि आपल्या हातावर त्याचे शिंतोडे उडाले तर तात्काळ हात सॅनिटायझरने स्वच्छ करावेत. पण हॅन्ड सॅनिटायझर जास्त काळ काम करत नाहीत.
अशा परिस्थितीत लोकांनी नियमित अंतराने हात हँडवॉश किंवा साबणाने धुवावेत. अल्कोहोल युक्त हॅन्ड सॅनिटायझर अधिक प्रभावी असले तरीही हे जास्त काळ तुमचे संरक्षण करत नाही. यामागील मूळ कारण म्हणजे आपण सतत करत असलेली हालचाल. आपण आपण काही ना काही काम करत असतो या दरम्यान आपण काही गोष्टींना स्पर्श देखील करत असतो त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला पुन्हा हात स्वच्छ करावे लागतात.
हे टाळण्यासाठी आपण दर दहा मिनिटांनी हँडवॉश आणि पाण्याने आपले हात धुवावे. जेव्हा आपण आपले हात पाण्याने स्वच्छ करतो तेव्हा संसर्गाची भीती कमी होते. पण काम करत असताना जेव्हा नको त्या वस्तूंना स्पर्श करतो तेव्हा त्या संसर्गाची शक्यता वाढू शकते. जेवणापूर्वी आणि चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी देखील आपले हात स्वच्छ धुवावेत.
जेव्हा आपण हात पाणी आणि हँडवॉशने स्वच्छ करतो त्यानंतर टॉवेलने आपले हात, नख कोरडे करा. सीडीसीच्या सल्ल्यानुसार गलिच्छ हातांनी हात स्वच्छ करण्याचा काही उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत प्रथम आपले हात धुवा. यानंतर स्वच्छता करा. जेव्हा आपण हात स्वच्छ करत असतो तेव्हा आपले हात किमान २० सेकंद चोळुन धुवा. आपल्या बोटांमधील भाग चांगले धुण्याचा देखील सल्ला दिला जातो.
टीप – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.