लग्न हा एक असा सोहळा असतो ज्यामध्ये अनेक आठवणींची साठवण करता येते. या आठवणी स्पेशल करण्यासाठी प्रत्येक जण अतोनात प्रयत्न करतो. त्यासाठी लग्नामध्ये लाखो करोडो रुपयांचा खर्च केला जातो. पाहुण्यांचे आगत-स्वागत दमदार पद्धतीने केले जाते. नवविवाहित दाम्पत्य सहा आलेले पाहुणे देखील तो लग्नसोहळा आयुष्यभर विसरणार नाहीत अशी काळजी त्या लग्नांमध्ये केली जाते.

या लग्नांमध्ये श्रीमंत लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात. आपण अनेकदा टीव्ही मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये असे धडाकेबाज लग्न सोहळा पाहिले आहेत. मात्र यांचा खर्च किती होतो याचा आपण स्वप्नात देखील विचार करू शकत नाही. बॉलीवूड मधील कलाकार काही वेळेस काही मोजक्या लोकांमध्ये लग्न करतात आणि नंतर रिसेप्शन मोठ्या धुमधडाक्यात करतात.

साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील असेच काहीसे आहे. हे कलाकार गर्दीपासून वाचण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंग हा पर्याय अवलंबतात. आज या लेखातून आम्ही तुम्हाला साउथ इंडस्ट्रीमधील काही महागड्या लग्नसोहळ्यांबद्दल सांगणार आहोत.

1. सूर्या आणि ज्योतिका – तमिळ इंडस्ट्रीमधील सूर्या हे एक नामांकित अभिनेता आहेत. तरुणाईमध्ये त्याची विशेष क्रेज आहे. सूर्याने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्याने अभिनेत्री ज्योतिका सोबत विवाह गाठ बांधली.
या लग्नामध्ये कमल हसन, असिन, धनुष यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या लग्न सोहळ्यात ज्योतिका च्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिळालेल्या माहितीनुसार या साडीची किंमत तब्बल तीन लाख रुपये होती. रिपोर्ट नुसार, या लग्नासाठी तब्बल १०० ते १५० कोटी खर्च करण्यात आला.

2. ऐश्वर्या आणि धनुष – वाय दिस कोलावरी डी फेम धनुषने सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या सोबत लग्न केले. विवाह सोहळा हा रजनीकांत यांच्या मुलीचा असल्यामुळे या लग्नात साउथ इंडस्ट्री सोबतच बॉलीवूड मधील अनेक मातब्बर कलाकार उपस्थित होते. धनुषने रांजना या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. रिपोर्ट नुसार, या लग्नासाठी खर्च झालेली रक्कम बाहेर आली नाही परंतु या लग्नाची रचना पाहता तगडा खर्च आला असेल.
3. स्नेहा आणि प्रसन्ना – अभिनेता आणि अभिनेत्री स्नेहा व प्रसन्ना ने दक्षिण भारतीय पद्धतीने लग्न केले. या लग्नात स्नेहाने सोनेरी रंगाची साडी नेसली होती व सोबतच भरपूर दागिने घातले होते. स्नेहाने नेसलेल्या साडीची किंमत दोन लाख रुपये असल्याचे म्हटले जाते. साउथ इंडस्ट्रीमध्ये स्नेहा आणि प्रसन्ना चे लग्न महागड्या लग्नाला पैकी एक असल्याचे म्हटले जाते.
4. ब्राह्मणी रेड्डी आणि राजीव रेड्डी – हैदराबाद येथील व्यवसायिक विक्रम देव रेड्डी यांचा मुलगा राजीव रेड्डीने ब्राह्मणी सोबत लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार या लग्नात तब्बल ५०० करोड रुपये खर्च केला गेला होता. 2016 वर्षातील हे लग्न सर्वात महागडे असल्याचे म्हटले जाते.

ब्राह्मणी हि गल्ली जनार्दन रेड्डी यांची मुलगी आहे. ते प्रसिद्ध माजी राजकारणी आणि खाणकाम क्षेत्रातील प्रसिद्ध उद्द्योजक आहेत. त्याची एकुलती एक मुलगी ब्राह्मणी आहे. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी बेंगलुरू पॅलेस मैदानावर हे लग्न झाले होते आणि संपूर्ण ठिकाण विजयनगर साम्राज्याची मोठी राजधानी हंपीच्या अवशेषांसारखेच बनविण्यात आले होते. आणि हा सर्व खर्च नोटबंदीच्या काळात झाला होता त्यामुळे खूप वादंग उठले होते.
5. अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी – तेलगू चित्रपट इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनने स्नेहा रेड्डी सोबत लग्न केले. स्नेहा रेड्डी तेलंगणा च्या शिक्षणतज्ञ कंचारा चंद्रशेखर रेड्डी यांची मुलगी आहे. स्नेहा व अल्लू अर्जुन च्या लग्नात एकूण १०० कोटी रुपये खर्च आला होता.
6. रामचरण तेजा आणि उपासना कामिननी – अभिनेता राम चरण ने अपोलो हॉस्पिटलच्या अध्यक्षांची नात उपासना कामिननी सोबत लग्न केले.त्यांच्या लग्नसोहळ्यात अमिताभ बच्चन, बोनी कपूर, रजनीकांत यांसारख्या मोठ्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. त्यांची लग्नपत्रिका उपासना च्या काकीने डिझाईन केली होती. ही एक लग्नपत्रिका १२०० रुपये होती असे म्हटले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *