टीव्ही इंडस्ट्री असो किंवा सिने इंडस्ट्री सर्वच कलाकार स्वतःच्या दिसण्याच्या बाबतीत खूप गंभीर असतात. प्रत्येक कलाकाराला वाटते की आपण समोरच्या कलाकारांपेक्षा अधिक सुंदर दिसावे. स्क्रीनवर आपला चेहरा प्रत्येक प्रेक्षकाला आवडावा. मात्र स्त्रियांच्या बाबतीत प्रेग्नेंसी नंतर सौंदर्याच्या व्याख्या थोड्या बदललेल्या जाणवतात.

त्यामुळेच टीव्हीवरील अभिनेत्री प्रेग्नेंसी नंतर लगेचच वजन कमी करण्याच्या प्रयत्नात गुंततात. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी प्रेग्नेंसी नंतर पुन्हा मूळ स्वरूपात येण्यासाठी तसेच फिगर मेण्टेन करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अथक प्रयत्न केल्यानंतर त्या त्यांच्या मूळ रुपात येण्यात यशस्वी होतात. आज या पोस्ट द्वारे आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत.

स्मृती खन्ना – मेरी आशिकी तुमसे ही या मालिकेतील स्मृती खन्नाने 15 एप्रिल ला एका गोड मुलीला जन्म दिला. डिलिव्हरी नंतर एका आठवड्यातच स्मृतीने स्वतःचे वजन कमी करण्यास सुरुवात केली आहे. तिच्या प्रेग्नेंसी वेळेचे फोटो आणि आत्ताचे फोटो यातील बदल पाहून तिचे चाहते खूपच हैराण झाले आहेत.
श्वेता तिवारी – तब्बल पंधरा वर्षानंतर श्वेता तिवारी दुसऱ्यांदा आई झाली. प्रेग्नेंसी मुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी श्वेताने खूप वर्क आऊट केले. जिम मध्ये घाम गाळल्या नंतर तिने तिला हवी तशी फिगर कमावली आहे. आता तिने टीव्ही मालिकांमध्ये काम करणे सुरू केले आहे.
कनिका महेश्वरी – दिया और बाती हम या मालिकेत दिसलेली कनिका महेश्वरी सुद्धा काही दिवसांपूर्वीच तिचे वाढलेले वजन कंट्रोल मध्ये आणले. डिलिव्हरी नंतर कानिकाने १७ किलो वजन कमी केले. एवढेच नव्हे आई बनल्यानंतर २५ दिवसातच ती तिच्या कामावर हजर झाली.
दीपिका सिंह – अभिनेत्री दीपिका सिंह ने सुद्धा आई झाल्यावर लगेच वर्कआऊट करणे सुरू केले. एवढेच नव्हे तर तिने तिचा लूक सुद्धा बदलला. आई बनल्यावर दीपिका कवच २ या मालिकेत दिसली होती.
निशा रावल – अभिनेत्री निशा रावल ने तिच्या डिलिव्हरी नंतर ४ महिन्यातच तिचे वजन घटवले होते. या साठी तिने खूप मेहनत घेतली. आई झाल्यानंतर तिच्यात जराही बदल झालेला जाणवला नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *