बॉलीवूडची ड्रीम गर्ल हेमामालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांची लव्ह स्टोरी आजच्या युवकांना एका उत्कृष्ट उदाहरणापेक्षा कमी नाही. त्यावेळी धर्मेंद्र-हेमा मालिनीच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की त्यांच्याहून १३ वर्षे लहान असलेल्या हेमा मालिनी सोबत लग्न करण्यासाठी त्यांनी स्वतःचा मूळ धर्म बदलला.

१९५८ पासून धर्मेंद्र यांनी त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न ते चित्रपटसृष्टीत येण्याआधीच झाले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर असे होते. धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी प्रकाश कौरच्या मध्ये सारे काही आलबेल होते.

त्यानंतर १९७० मध्ये धर्मेंद्र आणि हेमामालिनी ने पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली. त्यांनी शराफत आणि तूम हसीन ओर में जवां या चित्रपटांमध्ये काम केले.‌ त्यानंतर या दोघांमधील जवळीक वाढल्या च्या बातम्या सर्वत्र पसरू लागल्या. १९७० नंतर धर्मेंद्र आणि हेमामालिनी ने एकापाठोपाठ एक एकत्र चित्रपट केले आणि त्यांच्यातील प्रेम खुलू लागले.

धर्मेंद्र आधीपासूनच विवाहित असल्यामुळे हेमा मालिनी सोबत दुसरे लग्न करू शकत नव्हते. शिवाय त्यांना त्यांची पहिली पत्नी प्रकाश सोबत सुद्धा वेगळे व्हायचे नव्हते. हेमा मालिनीला सुद्धा धर्मेंद्र सोबत लग्न करायचे होते. पण लग्न करण्या आधी धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी समोर एक अट ठेवली ती म्हणजे तिच्याशी लग्न झाल्यानंतर ही ते त्यांच्या पहिल्या पत्नीला, मुलांना आणि परिवाराला सोडणार नाहीत. हेमाने सुद्धा त्यांची ही अट मान्य केली.

हेमा मालिनी सोबत दुसरे लग्न करण्यासाठी त्यांनी त्यांचा धर्म बदलला. त्यांनी हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारला आणि हेमा मालिनी सोबत लग्न केले. हेमा मालिनी सोबत लग्न करताना धर्मेंद्र यांनी त्यांचे नाव दीलावर खान असे केले होते.

१९७५ मध्ये रिलीज झालेल्या शोले या चित्रपटात दोघांच्या प्रेमाला उधाण आले होते. शोले चित्रपटाच्या चित्रीकरणदरम्यान ते चेन्नई मधील एका हॉटेल मध्ये थांबले होते. त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेंद्र च्या रूम मध्ये दरवाजा न वाजवताच आत घुसले आणि त्यावेळी धर्मेंद्र व हेमा मालिनी एकाच चादरी मध्ये लपेटले होते.
मस्करीत दिग्दर्शकांनी त्यांचे असे फोटो सुद्धा काढले होते. नंतर हे फोटो व्हायरल झाले आणि सर्वांसमोर आले मग धर्मेंद्र आणि हेमामालिनी चे प्रेम सर्वांसमोर आले. मीडिया रिपोर्ट नुसार हे फोटो समोर आल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २ मे १९७९ ला दोघांनी लग्न केले. नुकतेच यांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *