सैफ अली खान आणि करीना कपूर हे बॉलीवूड मधील प्रमुख अभिनेता अभिनेत्रींपैकी एक आहेत. बॉलीवूड मधील सर्वात श्रीमंत कपल म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. सैफ अली खानने 1993 मध्ये चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते तर करीना कपूरने 2000 मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर या दोघांची गाडी मार्गी लागली ते त्यांनी कधी वळून पाहिले नाही. या दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

सैफ आणि करिना ने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांप्रमाणे अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये सुद्धा काम केले. नेटफलिक्स ची हिट सिरीज सॅक्रेड गेम्स मधील सैफ चा अभिनय सर्वांनाच आवडला होता तर डान्स इंडिया डान्स मधील करीना ने केलेले परीक्षण लोकांना भावले होते.

करीनाने डान्स इंडिया डान्सचा एक एपिसोड्स जज करण्यासाठी ३ करोड रुपये घेतले होते. फोर्ब्स सेलिब्रिटी १०० नुसार २०१९ मध्ये सैफ अली खानची कमाई १७.०३ करोड रुपये होती. मुंबईतील त्याचे घर, त्याच्या वडिलांचे घर, कार आणि इतर सर्व गोष्टी मिळून सैफ कडे ८०० करोड रुपयांची संपत्ती आहे. तर करीना कपूर कडे ४५० करोड रुपये संपत्ती आहे.

पतोडी परिवाराचा वाढवडीलांपासून असलेला इब्राहिम पॅलेस महाल हा सुद्धा सैफ च्या मालकीचा आहे. सध्या हा पॅलेस निमराना हॉटेल म्हणून चालवला जातो. या पॅलेस मध्ये विदेशी पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था केली जाते. त्यांची संपत्ती २,८३१,०८,०००० रुपयांपेक्षा जास्त असल्याचे अनुमान आहे, तर पतौडीची मालमत्ता ७५० कोटींपेक्षा जास्त असल्याचे समजते.

करीनाने २००० मध्ये युद्ध या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपट दिले. सुरवातीला तिला करीयर मध्ये अपयश आले मात्र कभी खुशी कभी गम या चित्रपटानंतर तिची गाडी रुळावर आली आणि मग ती बॉलिवुड मधील टॉप ची अभिनेत्री बनली.

करिनाचा फॅशन सेन्स खूप कमाल आहे त्यामुळे अनेक तरुणी तिची स्टाईल फॉलो करत असतात. करीनाने बजरंगी भाईजान, उडता पंजाब, जब वी मेट, हिरोईन, गोलमाल सिरीज, विरे दीं वेडिंग, गुड न्यूज यासारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

करीना आणि सैफ ला एक मुलगा असून त्याचे नावं तैमूर आहे. आता नुकताच करीनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तर सैफ अली खानचे करीना कपूर आधी अभिनेत्री अमृता सिंह सोबत लग्न झाले होते. तिच्यापासून सैफ ला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. सध्या नवीन फळीतील कलाकारांमध्ये साराचे नावं आवर्जून घेतले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *