बॉलिवूड मधील अभिनेते अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर बद्दल सांगणार आहोत. २०१५ मध्ये “दम लगाके हैशा” या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत भूमी पेडणेकरने पाऊल ठेवले. या चित्रपटात तिने अतिलठ्ठ असलेल्या पत्नीचं पात्र रंगवलं. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

हल्लीच भूमी पेडणेकर विकी कौशल सोबतच्या “भूत” या चित्रपटात आपल्याला दिसली होती. आतापर्यंत भूमीने टॉयलेट – एक प्रेम कथा, शुभ मंगल सावधान, बाला, पती पत्नी और वो, सांड की आंख या चित्रपटांत तिने काम केले आहे. सांड की आंख या चित्रपटातील ‘चंद्रो तोमर’ यांचे पात्र भूमीने साकारले होते, त्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

येत्या काळात भूमी बधाई हो-२ आणि दुर्गावती या चित्रपटात दिसेल. सध्या भूमी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. एका मनोरंजनपर पोर्टलशी बोलताना तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे, ती म्हणाली; “मी आयुष्यभर एकटीच राहणार आहे ना कोणाला डेट करणार, ना कोणाशी लग्न करणार.” !

याच चर्चेच्या दरम्यान विचारल्या गेलेल्या डेट आणि लग्नाबाबत प्रश्नाचे उत्तर देत भूमी पेडणेकर म्हणाली, मी एखाद्या अभिनेत्याला यासाठी डेट करू इच्छित नाही कारण, ते दोघे एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. तिने लग्न न करण्यामागचं कारण तिचा किंमती वेळ असं दिलं आहे.

आपल्या संघर्षरहित जीवनाबद्दल देखील तिने या चर्चेदरम्यान सांगितले. कॅन्सरमुळे तिने लहान वयात आपल्या वडिलांना गमावले. तेव्हा भूमी अठरा तरं तिची लहान बहीण पंधरा वर्षांची होती. त्या परिस्थितीशी सामना करणं कठीण होतं. पण तिच्या आईने तिला प्रत्येक पाऊलावर मदत केली.

ती चित्रपटांमध्ये काम करण्याआधी यशराज फिल्म्स मध्ये सहाय्यक कास्टिंग दिग्दर्शक म्हणून सहा वर्ष काम केले. ती तिच्या कुटुंबाला एखाद्या योद्धापेक्षा कमी नाही समजत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *