२००७ मध्ये प्रदर्शित झालेला वेलकम हा बॉलीवुड चित्रपट सर्वांच्या लक्षात असेल. या चित्रपटामध्ये एक विलन होता या विलन चे नाव या चित्रपटात आ र डी ए क्स असे होते. मात्र या आ र डी ए क्‍स चे खरे नाव फिरोज खान असे आहे. फिरोज खान यांनी अभिनयासोबतच निर्माता क्षेत्रात सुद्धा पाऊल ठेवले व उत्कृष्ट कलाकृती बॉलिवूडला दिल्या.

सुरुवातीच्या काळात त्यांना लीड ॲक्टर बनण्याची इच्छा होती मात्र १९५७ मध्ये आलेल्या जमाना या चित्रपटामध्ये त्यांना सहाय्यक अभिनेता साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुढील तीन वर्षे दीदी (१९५९), घर कि लाज ( १९६०) यासारख्या चित्रपटांमधून सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले.
फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले त्यावेळी फिरोज खान केव्हा १८ वर्षांचे होते. त्यावेळी ते एका विदेशी मुलीच्या प्रेमात पडले. त्या मुलीला फिरोज खान सोबत लग्न करण्याची इच्छा होती मात्र फिरोज खान यांना त्यांचे करिअर घडवायचे होते. त्यामुळे करिअर घडविण्याच्या नादात त्यांनी स्वतःच्या पहील्या प्रेमावर पाणी सोडले.

सुरुवातीच्या काळात फिरोज खान यांना रिपोर्ट राजू, सैमसन, चार दरवेश, एक सपेरा एक लुटेरा, सीआयडी ९९९, यांसारखे कमी बजेट वाले थ्रिलर चित्रपट मिळाले होते. इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी फिरोज खान यांना आठ वर्षांचा मोठा कालावधी लागला. त्यानंतर १९६५ मध्ये आलेल्या उंचे लोग या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली.
हे झाले फिरोज खान यांच्याबद्दल आज आम्ही तुम्हाला त्यांच्या मुलीबाबत थोडी माहिती देणार आहोत. फिरोज खान यांना एक मुलगी असून तिचे नाव लैला खान असे आहे. लैला दिसायला फारच सुंदर आणि स्टायलिश आहे. मात्र ती तिच्या वडिलांना प्रमाणे फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऍक्टिव्ह नाही.

सर्वसाधारणपणे फिल्मस्टार ची मुले त्यांच्या आई-वडिलांना प्रमाणेच चित्रपटांमध्ये काम करण्याची स्वप्ने पाहतात. त्यातील काही स्टार किड्स चे स्वप्न पूर्ण होते. मात्र इंडस्ट्रीमध्ये खासकरून अशीही काही स्टार किड्स आहेत ज्यांना जाणीवपूर्वक इंडस्ट्री पासून दूर ठेवले जाते.

उदाहरणार्थ पूर्वी कपूर खानदानाची परंपरा होती की त्यांचा कुटुंबातील कोणतीही मुलगी चित्रपटांमध्ये काम करणार नाही. तसेच फिरोज खान यांच्या कुटुंबातील सुद्धा परंपरा आहे की त्यांच्या कुटुंबातील मुलगी चित्रपटांमध्ये दिसणार नाही.
कदाचित याच कारणामुळे फिरोज खान यांची मुलगी चित्रपट इंडस्ट्री पासून दूर राहते. तर दुसरीकडे लैला खानचा भाऊ आणि फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान हा एकेकाळचा सुप्रसिद्ध अभिनेता होता. चित्रपट सृष्टी पासून दूर राहून देखील लैला खानने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तिची ही ओळख तिच्या वडिलांनी मुळे किंवा भावामुळे झालेले असून ती तिच्या मेहनतीवर झालेली आहे. लैला खानच्या पेंटिंग भारतासोबत भारताबाहेर देखील प्रदर्शित करून विकल्या जातात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *