टीव्ही किंवा चित्रपटांमध्ये काम करणारे बालकलाकार त्यांच्या निरागस अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यास यशस्वी ठरतात. आपल्याकडे केवळ बाल कलाकारांवर आधारित अनेक मालिका आणि चित्रपट आहेत. या मालिका आणि चित्रपट बालकलाकारांच्या सहज अभिनयामुळे सुपरहिट झाले.

चित्रपट किंवा मालिकेतील या बालकलाकारांचा अभिनय पाहून हे बालकलाकार मोठे होऊन नक्की बॉलीवूड मध्ये गाजवतील असे प्रेक्षकांना वाटायचे. मात्र वेळ जात गेला तसतसे हे बालकलाकार टीव्ही पडद्यापासून दूर होत गेले. आता या बालकलाकारांची नावे जरी आठवत नसतील तरीही त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांनी काम केलेले चित्रपट किंवा मालिका प्रेक्षक सहज ओळखतील.

1. आदित्य कपाडिया – शाकालाका बूम बूम लोकप्रिय मालिकेतील झुमरू ही भूमिका साकारलेला मुलगा तुमच्या लक्षात असेलच. ही भूमिका आदित्य कपड्याने साकारली होती. आदित्यने मालिका सोबतच काही चित्रपटांमध्ये देखील काम केले. जानवर या चित्रपटांमध्ये आदित्य ने अक्षय कुमार सोबत काम केले होते.

मात्र हळूहळू आदित्य इंडस्ट्री पासून दूर होत गेला. आदित्य आता ३३ वर्षांचा असून सर्वात शेवटी तो कलर्स वाहिनीवरील एका मालिकेत दिसला होता. सध्या तो सोशल मीडियावर खूप ॲक्टिव असतो.
2. अमितेश कोचर – ९० च्या दशकात लहान मुलांमध्ये शक्तिमान ही मालिका भरपूर लोकप्रिय होते. मात्र शक्तिमान मालिकेला जूनियर जी सुपरहिरोची मालिका टक्कर देत होती. त्यावेळी या मालिकेतील सुपरहीरोच्या नावाची चर्चा भरपूर होत होती.

यामुळे ज्युनियर जी ची भूमिका साकारणारा बालकलाकार रातोरात स्टार झाला. या बालकलाकाराचे नाव अमितेश कोचर असे आहे. ज्युनियर जी या मालिकेनंतर पुन्हा कधीच टीव्हीवर काम केले नाही. सध्या तो युट्युब वर ब्लॉग बनवतो.
3. दर्शील सफारी – आमिर खानच्या प्रॉडक्शन मधील चित्रपट ‘तारे जमीन पर’ मधील दर्शील सफारी ने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला. अभ्यासासाठी दर्शील काहीकाळ इंडस्ट्री पासून दूर होता मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर दर्शील पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये आला.

२०१५-१६ मध्ये त्याने थिएटर करायला सुरुवात केली. दर्शील ने कॅन आय हेल्प यू या नाटकात काम केले होते. दर्शील आता २३ वर्षांचा आहे मात्र अजूनही त्याच्या हातात कोणता मोठा प्रोजेक्ट लागलेला नाही.
4. तन्वी हेगडे – लोकप्रिय मालिका सोनपरी मधील फ्रुटी ही भूमिका अभिनेत्री तन्वी हेगडे ने साकारली होती. तन्वीने वयाच्या तिसऱ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले . सोनपरी सोबतच तिने शाकालाका बूम बूम या मालिकेमध्ये देखील काम केले. मालिका व्यतिरिक्त काही चित्रपटांमध्ये देखील ती दिसली होती.

संजय दत्तच्या पिता या चित्रपटात तन्वीने महत्वपूर्ण भूमिका साकारली. मात्र सध्या तनवी मोठ्या पडद्यावरून गायब झाली आहे. परंतु ती सोशल मीडियावर ॲक्टिव असते.
5. परजान दस्तुर – कुछ कुछ होता है या चित्रपटामध्ये एक छोटा मुलगा होता. हा मुलगा चित्रपटात सतत तारे मोजत असायचा. त्याने छोट्या सरदार ची भूमिका साकारली होती. ही भूमिका परजान दस्तूर ने साकारली होती. ‘कुछ कुछ होता है’ मधील हा ‘छोटा सरदार’आता इतका मोठा झाला आहे की तो लवकरच विवाह बंधनात अडकले.

परजान २०१० मध्ये आलेल्या ब्रेक के बाद या चित्रपटात सर्वात शेवटचा दिसला होता. याव्यतिरिक्त त्याने २०१७ मध्ये एक शॉर्ट फिल्म केली होती.
6. आयशा कपूर – २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटातील मिशेल ला कोणी विसरू शकत नाही. ही भूमिका साकारली होती आयशा कपूर ने.

या चित्रपटासाठी आयशाला बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर २००९ मध्ये ती सिकंदर या चित्रपटात दिसली. त्यानंतर ती मोठ्या पडद्यावर फारशी दिसली नाही मात्र सध्या ती हेल्थ एक्सपोर्ट म्हणून काम करते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *