कलाकारांचं लग्न होऊन एकमेकांपासून वेगळं होणं, घ*ट*स्फो*ट होणं ही एक साधी गोष्ट मानली जाते. आज यांचं लग्न तर उद्या दुसरा कोणाचा तरी ब्रेकअप तर नंतर तिसऱ्याचं लग्न अशा बातम्या येतच असतात. अनेक कलाकारांनी तर ३, ४ लग्न देखील केली आहेत.

अनेक मोठे कलाकार देखील अपवाद नाहीत. काही कलाकार तर असे आहेत ज्यांचं लग्न तर एक वर्ष ही टिकलं नाही. एका वर्षातच त्यांचा घ*ट*स्फो*ट होऊन ते वेगळे झाले. तर त्यापैकी काहींनी दुसरे लग्न देखील केले आहे. चला तर पाहुयात कोण आहेत हे कलाकार.

१. पुलकित सम्राट – फुकरे सिरीजमुळे बॉलीवूडमध्ये पुलकित सम्राट अधिक प्रसिद्ध झाला. २००६ मध्ये आलेल्या सास भी कभी बहू थी या मालिकेमध्ये त्याने काम केले होते. पुलकितने २०१४ मध्ये सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा सोबत गोव्यामध्ये लग्न केले. तो श्वेताला २०१० मध्ये मुंबईत भेटला होता. पण पुलकित सम्राटचं यामी गौतमसोबत अफेयर असल्यामुळे २०१५ मध्ये दोघांचा घ*ट*स्फो*ट झाला. सध्या तो कीर्ती खारबंदा सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.


२. करण सिंग ग्रोव्हर –
करण सिंह ग्रोवर हा एक मॉडेल, अभिनेता व निर्माता आहे. टीव्हीवरील मालिकांमधून प्रसिद्ध होत त्याने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सध्या तो एमएक्स प्लेअर वरील एका वेबसिरीज मध्ये होता. सर्वांनाच माहित आहे की बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू ही करणची तिसरी पत्नी आहे.


त्याचा पहिल्या पत्नीचं नाव श्रद्धा निगम होतं. त्याने श्रद्धा निगम हिच्याशी २००८ मध्ये लग्न केलं पण २००९ मध्ये काही कारणांवरून त्यांचा घ*ट*स्फो*ट झाला.

नंतर २०१२ मध्ये हिंदी मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट सोबत त्याने २०१२ मध्ये लग्न केले, परंतु त्या दोघांचा ही २०१४ मध्ये घ*ट*स्फो*ट झाला. त्यानंतर अलोन या हिंदी भयपटासाठी बिपाशा व करण एकमेकांना भेटले व त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी लग्न केले.

३. मंदाना करिमी – टीव्ही वरील प्रसिद्ध हिंदी रिऍलिटी शो पैकी एक म्हणजे ‘बिग बॉस’. या बिग बॉस च्या ९व्या पर्वात प्रसिद्ध झालेली मॉडेल आणि अभिनेत्री ही मंदाना करिमी होय. मंदाना ही एक इराणी मॉडेल आहे.

२०१७ मध्ये तिने उद्योजक गौरव गुप्ता याच्यासोबत लग्न केले. परंतु त्यांचं हे नातं ६ महिने देखील टिकलं नाही आणि त्यांनी एकमेकांना घ*ट*स्फो*ट दिला. मंदानाने तिच्या पतीवर घरेलू हिं*सेचा आरोप देखील लावला होता.


४. चाहत खन्ना – टीव्हीवरील मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री चाहत खन्ना हिला आपण अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये पहिले आहे, जसे की कबूल है, बडे अच्छे लगते है. तिने २००६ मध्ये उद्योजक भरत नरसिंघानी याच्यासोबत लग्न केले होते. परंतु ७ महिन्यातच ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.


त्यानंतर २०१३ मध्ये तिने फरहान मिर्झा सोबत लग्न केले व ते दोघे ही २०१८ मध्ये घ*ट*स्फो*ट घेत एकमेकांपासून वेगळे झाले.

५. मल्लिका शेरावत – बॉलीवूडमधील सर्वात बोल्ड व प्रसिद्धी अशी अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. मल्लिकाने २००० मध्ये करण सिंग गिल याच्यासोबत लग्न केले. परंतु काही कारणास्तव २००१ मध्येच या दोघांचा घ*ट*स्फो*ट झाला व ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. मुश्कीलने वर्षभर त्यांचं हे लग्न टिकू शकलं आहे. या लग्नानंतर मल्लिकाने दुसरं कोणासोबत ही लग्न केले नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *