प्रत्येक अभिनेत्री हि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सारखी चर्चेत येत असते. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत जिने एका चित्रपटात २५ हून अधिक किसिंग सीन दिले आहेत चला तर जाणून घेऊयात कोण आहे ही अभिनेत्री.

आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत तिचे नाव शालिनी पांडे असे आहे. ही अभिनेत्री साउथ कडील चित्रपटात काम करते. शालिनी पांडेने अर्जुन रेड्डी या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. विजय देवरकोंडा आणि शालिनी पांडे यांचा अर्जुन रेड्डी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरला.

अर्जुन रेड्डी या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि शालिनी पांडेने २५ हून अधिक किसिंग सीन दिले होते. शालिनी पांडे ही मूळची मध्यप्रदेशातील जबलपूर येथे राहणारी आहे. अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हिंदी मध्ये सुद्धा रिमेक करण्यात आला. या चित्रपटाचे नाव कबीर सिंह असे होते. त्यामध्ये शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी हिने मुख्य भूमिका केली होती.

अर्जुन रेड्डी हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर त्याचे लेखक-दिग्दर्शक संदीप वांगा यांनी अर्जुन रेड्डी चा रिमेक हिंदीमध्ये बनवण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांची प्रथम पसंती रणवीर सिंह होती. पण रणवीर सिंह च्या व्यस्त शेड्युलमुळे ते त्यांना जमले नाही त्यामुळे त्यांनी शाहिद कपूर सोबत संपर्क साधला.

शाहिद कपूरच्या अपोझिट कियारा अडवणी ही अभिनेत्री प्रीती या भूमिकेत दिसली होती. मात्र सुरुवातीच्या काळात काही गोष्टींमुळे कियारा अडवणी या चित्रपटासाठी उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे प्रीती या भूमिकेसाठी तारा सुतारिया या अभिनेत्रीचे नाव घोषित करण्यात आले होते.

मात्र तारा सुतारिया चा पहिला चित्रपट स्टुडन्ट ऑफ द इयर २ या चित्रपटाच्या शेड्युलमध्ये थोडे बदल झाल्यामुळे तारा चे नाव कबीर सिंह या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर निर्मात्यांनी प्रीती या भूमिकेसाठी पुन्हा एकदा कियारा अडवणीस विचारणा केली.

संदीप वांगा यांना प्रीती या भूमिकेसाठी कियाराच हवी होती याचे मुख्य कारण वांगा यांनी एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी मधील अभिनय पाहिला होता. त्या चित्रपटात कियारा ने जो निरागस अभिनय केला होता तसाच अभिनेत्यांना कबीर सिंह या चित्रपटात अपेक्षित होता. शेवटी कियारा या भूमिकेस राजी झाली आणि कबीर सिंह हा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *