बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे चित्रपट हिट झाल्यावर त्यांच्याकडे जाहिरातीवर चित्रपटांची रांग लागते. यामार्फत या भरपूर पैसे कमावून ठेवतात. एवढा पैसा की त्यांच्या पुढच्या काही पिढी बसून खातील इतका. मात्र प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रींवर अचानक काळाचा घाला पडतो आणि त्या सर्वांना सोडून निघून जातात.

यातील काही अशा अभिनेत्री आहेत त्या त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अभिनेत्री हे जग सोडून निघून गेल्या मात्र त्यांच्या परिवारासाठी इतका पैसा सोडून गेलात की त्यांच्या परिवाराला कोणतेही काम करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत ज्या मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या परीवाराला करोडो रुपयांची संपत्ती मिळाली.

1. जिया खान – गजनी आणि निशब्द यांसारखे सुपरहिट बॉलीवूड चित्रपट करणारी अभिनेत्री जिया खानचा मृत्यू अचानक झाला होता. मुंबईत आल्यावर जिया खानची ओळख आदित्य पंचोली यांचा मुलगा सुरज पंचोली सोबत झाली. हे दोघे एकमेकांना खूप काळ डेट करत होते.

मात्र यांच्या नात्याचे पडसाद खूप गंभीर उमटले. जून २०१३ मध्ये जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये जियाचा मृतदेह पंख्याला लटकलेला मिळाला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जियाच्या मृत्यूनंतर तिच्या परिवाराला जियाचे १५ करोड रुपये मिळाले.

2. दिव्या भारती – ८० -९०च्या दशकातील बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सुपरहिट अभिनेत्री दिव्या भारती कमी वयात स्वतःची वेगळी ओळख इंडस्ट्रीमध्ये तयार केली होती. कमी वयात अभिनेत्री दिव्या भारती ने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून दिव्या भारती चा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर दिव्याभारती तिच्या परिवारासाठी ७० करोडो रुपयांची संपत्ती सोडून गेली.

3. सौंदर्या – अभिनेत्री सौंदर्य ही साउथ इंडस्ट्रीमधील एक नामांकित अभिनेत्री होती. तिने बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले होते. सौंदर्या अमिताभ बच्चन सोबत सूर्यवंशम या चित्रपटात दिसली होती. अभिनयासोबतच सौंदर्या राजकारणात सुद्धा सक्रिय होती.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्लेन क्रॅश झाल्यामुळे सौंदर्याचा मृत्यू झाला. मिडीयाने दिलेल्या रिपोर्ट नुसार मृत्यूनंतर सौंदर्या तिच्या परिवारासाठी ५० करोड रुपये पाठी सोडून गेली.

4. रिमा लागू – बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील एक नामांकित अभिनेत्री रीमा लागू या छोट्या व मोठ्या पडद्यावरील आईची भूमिका उत्तम रित्या पार पडायचा. त्यांची ओळख विशेषतः ओन स्क्रीन सलमान खान ची आई म्हणून झाली होती.

अभिनेत्री रीमा लागू यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री रिमा लागू त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवारासाठी तीस करोड रुपयांची संपत्ती सोडून गेल्या.

5. श्रीदेवी – बॉलीवुड ची हवाहवाई गर्ल आणि ८०-९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी चा मृत्यू सर्वांच्या मनाला चटका लावणारा होता. श्रीदेवी दुबईत फंक्शन अटेंड करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेस बाथ टब मध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीदेवी त्यांच्या परिवारासाठी २४७ करोडो रुपयांची संपत्ती पाठी सोडून गेल्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *