क्रिकेट जगतातील प्रसिद्ध जोडपं म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. त्यांच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. ऑगस्टमध्ये अनुष्का आणि विराटने आपल्या घरी येणाऱ्या नव्या पाहुण्यासंबंधित सांगत इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर केली होती. आयपीएल दरम्यान अनुष्काच्या प्रेग्नन्सी संबंधित अनेक फोटो व व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर होत होते.

त्यात अनुष्का आपल्या प्रेग्नेंसीचा आनंद घेतानाचे फोटो होते. सध्या विराट कोहली हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून अनुष्का शर्मा दुबईवरून भारतात परत आली आहे आणि गरोदर असताना देखील ती शूट करताना दिसत आहे.

आपल्या डिलिव्हरीच्या आधी ती तिची निश्चित सर्व काम पूर्ण करत आहे. तिचे अनेक शूट करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अनुष्का शर्मा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिने आपल्या टीमसोबत शूटिंगसाठी परतली असल्याचा फोटो शेयर केला होता. त्यात तिचा टीमने पीपीई किट घातला होता. त्यात तिने लिहलं होत की, असं वाटत आहे सेट वर एखादा ड्रेस कोड देण्यात आला आहे.

त्यापुढे एक मजेदार इमोजी दिला होता. तिची टीम अनुष्का गरोदर असल्यामुळे कोरोनाच्या काळात सर्व गोष्टी काळजीपूर्वक हाताळून करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करत अनुष्का निळ्या ड्रेसमध्ये व्हॅनिटी व्हॅनमधून उतरताना दिसत आहे.

पुढील एका फोटोमध्ये अनुष्का पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घालून व्हॅनमधून उतरताना दिसत आहे. अनुष्का गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात असताना देखील तिने आपले वजन बिलकुल वाढू दिले नसल्याने तिचे चाहते तिचे कौतुक करत आहेत. ती पूर्वीसारखीच सुंदर आणि फिट दिसत आहे.

अनेक चाहते तिच्या या फोटोवर कमेंट देखील करत आहेत. अनुष्काने तिच्या गरोदरपणाच्या काळात घातलेले ड्रेस हे इतर गरोदर महिलांना त्यांच्या गरोदरपणाच्या काळात घालण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करतील.

नुकतीच गेल्या मंगळवारी अनुष्का एका सेटवर दिसली. या दरम्यान अनुष्काने पंधरा शॉर्ट ड्रेस आणि पांढरा मास्क परिधान केलेला होता. या ड्रेसवर अनुष्काने जॅकेट घातले होते. आणि बेबी बंप चित्रात स्पष्ट दिसत होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *