‘जाने तू या जाने ना’ फेम अभिनेत्री ‘जेनेलिया डिसूझा’ हिने मराठमोळ्या रितेश देशमुख सोबत लग्न केले. सध्या त्यांची जोडी बॉलिवूडमधील क्युट कपल म्हणून ओळखली जाते. या जोडीचा चाहता वर्ग भरपूर मोठा आहे. अभिनेत्री जेनेलिया डिसूझा ने बॉलीवुड सोबत साउथ इंडस्ट्रीत तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले.

साउथ मध्ये सुद्धा ती एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र रितेश देशमुख सोबत लग्न झाल्यावर ती मोठ्या पडद्यावरून गायब झाली. लग्नानंतर ती चित्रपटांमध्ये फक्त पाहुणी कलाकार म्हणूनच दिसली होती. त्यामुळे तिचे चाहते तिला प्रमुख भूमिकेत पाहण्यास भरपूर उत्सुक आहेत.

जेनेलियाचा खूप जुना चित्रपट ‘इट्स माय लाईफ’ हा प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी जेनेलियाने या चित्रपटाबद्दल व स्वतःच्या करिअर संबंधी माध्यमांशी गप्पा मारल्या. पिंकविल्ला या संकेतस्थळा सोबत बोलताना जेनेलिया ने सांगितले की, जेव्हा तिने रितेश सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी काही लोकांनी हे लग्न करू नको त्यामुळे तुझे करिअर संपू शकते असा सल्ला दिला होता.

जेनेलिया ने सांगितले की ती जेव्हा रितेश सोबत लग्न करत होती त्यावेळी अनेकांनी तिला टोकले होते. तू लग्न करत आहेस, लग्नामुळे तुझे करिअर संपू शकते वेळीच विचार कर! त्यावेळी मी सर्वांचे बोलणे ऐकून घेतले मात्र माझ्या मनात एक गोष्ट स्पष्ट होते की, आता कोणी काहीही सांगितले किंवा कोणतीही गोष्ट मला रितेश सोबत लग्न करण्यास अडवू शकत नाही.

कारण मला स्वतःला हे लग्न करायचे होते. आता इतक्या वर्षांनी मला इंडस्ट्रीमध्ये एक सकारात्मक बदल पाहायला मिळतो. आता इंडस्ट्रीमधील लोकांचे विचार जुने राहिले नाहीत.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांनी त्यांच्या बॉलिवूडमधील करिअरला एकत्र सुरुवात केली होती. या दोघांनी २००३ मध्ये आलेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांमधील जवळीक वाढली. लग्नाआधी या दोघांनी एकमेकांना १० वर्षे डेट केले. त्यानंतर २०१२ मध्ये जेनेलिया व रितेश विवाहबंधनात अडकले. आता या दोघांना रियान व राहील ही दोन मुले आहेत.

जेनेलिया च्या ‘इट्स माय लाईफ’ या चित्रपटाचे चित्रीकरण १० वर्षांपूर्वीच झाले होते मात्र काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नव्हता. १० वर्षांनी या चित्रपटाला प्रदर्शनाचा मुहूर्त सापडला असून हा चित्रपट कोणत्या मोठ्या पडद्यावर किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर नव्हे तर छोट्या पडद्यावरच प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट झी सिनेमा वर प्रदर्शित होईल. हा चित्रपट २००६ मध्ये आलेला तेलगू चित्रपट Bommarillu चा रिमेक आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *