ज्या घरातून धक्के मारून बाहेर काढले, त्याच घराला खरेदी केले या अभिनेत्याने !

670

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी स्वतःच्या जीवावर यशाच्या पायर्‍या चढल्या आहे. या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी बरीच मेहनत घेतली होती. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याला घरातून बाहेर काढण्यात आले आणि यशस्वी होताच तेच घर त्याने विकत घेतले. असे कलाकार दुर्मिळ असतात पण त्यांच्या परिश्रमाने त्यांनी सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत तो दुसरा कोणी नाही तर सर्वांचा लाडका बॉलीवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’ हा आहे. राजीव भाटिया असे त्याचे खरे नाव आहे. अक्षयचा जन्म पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला होता. तो एका गरीब कुटुंबात जन्माला आला. त्याच्या कुटुंबातील पहिला माणूस आहे जो अभिनेता झालाय पण अक्षय कुमार जेवढा यशस्वी अभिनेता झाला आहे, तेवढेच त्याचे आयुष्यही अडचणींनी भरलेले होते.

जेव्हा अक्षय कुमार भारतातून बँगकॉकला गेले तेव्हा ते कामासाठी फिरत होते. त्यानंतर एका फोटोग्राफरने अक्षयला मॉडेलिंगचे सुचविले पण मॉडेलिंग फोटोशूट करण्यासाठी अक्षय कुमारकडे पुरेसे पैसे नव्हते. मग ते एका मोठ्या घराच्या भिंतीसमोर त्याचे फोटोशूट करत असे पण हे करत असताना त्या घराच्या पहारेकराने हे पहिले आणि अक्षयला धक्के मारून घराबाहेर काढले पण यशस्वी झाल्यावर अक्षय कुमारने तेच घर विकत घेतले.

गेली दोन दशकांहून अधिक काळ तो जगभरातील लोकांच्या मनावर राज्य करतोय. त्याने त्याच्या अभिनयाच्या आणि फिटनेसच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अक्षय कुमारने आपल्या कारकिर्दीतील एका पेक्षा एक उत्तम चित्रपट केले आहे.

लक्ष्मी हा चित्रपट प्रदर्शित झाला परंतु म्हणावा तेवढा तो चित्रपट प्रेक्षकांना भावला नाही. तसेच अक्षय ने मेहनतीच्या जोरावर अनेक सामाजिक चित्रपटात काम करून आपले वेगळेपण प्रेक्षकांना दाखवले आहे. अक्षयने पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा ऐरलिफ्ट सारखे दमदार चित्रपट केले आहे. त्याशिवाय तो अनेक जाहिरातीत आपल्याला दिसतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !