बॉलीवूड मध्ये अनेक क्युट कपल आहेत. या इंडस्ट्रीत कोणाची जोडी कोणाशी कधी जमेल किंवा तुटेल हे सांगता येत नाही. मात्र या कपल्स ची बॉण्डिंग पाहून अनेकांना हेवा वाटतो. या कपल्स मधील एक कपल हल्ली खूप चर्चेत आहे. हे कपल दुसरे तिसरे कोणी नसून मलाइका व अर्जुन कपूर आहेत. अर्जुन कपूर आणि मलाइका च्या वयातील अंतर तसेच मलाइका चा घ’ट’स्पो’ट, तिचे वैयक्तिक आयुष्य याबाबत सोशल मीडियावर अनेक टिपणी होत असतात.

मध्यंतरी असे म्हटले जात होते की, मलाइका आणि अर्जुन च्या रिलेशन मुळे कपूर परिवार खुश नाही. एका इंटरव्यू दरम्यान अनिल कपूर यांना जेव्हा या दोघां बाबत प्रश्न विचारले गेले त्यावेळेस त्यांनी असे काही उत्तर दिले ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सुखी परिवाराची शिकवण – अनिल कपूर यांचे खालील विधान परिवाराला सुखी ठेवण्यासाठी भरपूर आवश्यक आहे. अनेक परिवारामध्ये घरातील मोठे सदस्य लहानांवर त्यांच्या इच्छा अपेक्षा थोपतात. त्यांच्या आयुष्यातील निर्णयांमध्ये नेहमी दखल अंदाज घेतात. या पाठी जरी त्या व्यक्तीची खुशाली हा हेतू असला तरीही, त्यांचा हा दबाव घरातील वातावरण हळूहळू नकारात्मक बनवते.

हे होते अनिल कपूर यांचे उत्तर – एका चॅट शो दरम्यान अभिनेता अनिल कपूर यांना त्यांचा पुतण्या अर्जुन कपूर आणि मलाइका अरोरा यांच्या डेटिंग बाबत प्रश्न विचारले. त्यावेळेस या प्रश्नावर अनिल कपूर यांनी जबरदस्त उत्तर दिले. त्याने म्हटले, मी त्याला खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. त्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्यातच मी खुश असतो.

या प्रश्नावर मी कोणतेच वक्तव्य देऊ इच्छित नाही. कारण की त्याची वैयक्तिक बाब आहे. ज्या गोष्टीत एखाद्याला आनंद मिळत असेल तर त्या गोष्टीवरून आपण देखील खुश राहिले पाहिजे या विधानावर आमच्या परिवारातील सर्व सदस्यांचा विश्वास आहे.

वर्षभरापूर्वी मलाईकाने तिच्या लग्नाची प्लॅनिंग शेअर केली होती. तिने एका चॅट शो मध्ये सांगितले होते की तिचे लग्न ख्रिश्चन संस्कृती नुसार होईल आणि ते समुद्र किनारी असेल. मला ब्रेडमेड्स ही कन्सेप्ट खूप आवडते. मलाईका ला अर्जुन सर्व दृष्टिकोनातून परिपूर्ण वाटतो असे देखील ती म्हणाली. 2019 ला अर्जुन च्या वाढदिवशी मलाईकाने त्यांच्या नात्या बद्दल जाहीर केले होते. त्यावेळी या दोघांच्या वयात खूप अंतर असल्यामुळे या जोडीला सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील केले गेले.

यापूर्वी मलाईकाचे अरबाज खान सोबत लग्न झाले होते. मात्र त्यांचा लग्नाच्या खूप वर्षानंतर घ’ट’स्फो’ट झाला. या दोघांचे 1998 ला लग्न झाले. त्यानंतर २०१६ पासून ते वेगळे राहू लागले. २०१७ मध्ये त्यांचा घ’ट’स्फो’ट झाला. त्यानंतर तिच्या आयुष्यात अर्जुन कपूर ची एंट्री झाली.

याबाबत सांगताना मलाईका म्हणाली की प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात पुढे गेले पाहिजे . मला माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम उमगले. आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेम आणि एखाद्या व्यक्तीची साथ महत्वाची असते. तुम्ही सुद्धा जर असे करत असाल तर माझ्या दृष्टीने तुम्ही नशीबवान आहात.

मानसिक आणि भावनिक दडपण – एवढेच नव्हे तर हा दबाव त्या व्यक्तीच्या आयुष्यात मानसिक आणि भावनिक दडपण बनते. त्यामुळे त्या व्यक्तीचे परिवारातील वागणे बदलते. भरपूर वर्षांमधील प्रेमाचे रुपांतर हळूहळू इरिटेशन आणि नाराजीत बदलू लागते. ती व्यक्ती परिवारातील कुठल्याच सदस्यांशी मिळतेजुळते करून घेत नाही. या परिस्थितीत ती व्यक्ती जरी स्वतःच्या सुखांना दुर्लक्षित करत असेल तरीही त्याच्यासाठी घरातील इतर सदस्यां सोबत राहणे मुश्किल होते. त्यानंतर हळूहळू ती व्यक्ती वेगळे राहण्याचा निर्णय घेतो.

परिवार विभक्त होतो – स्वतःचे सुख दुर्लक्षित करणे कोणाला आवडेल? विशेषतः गोष्ट जर प्रेमाची असेल तर परिवाराचा हट्ट सहन न झाल्यास ती व्यक्ती त्याचा मार्ग वेगळा अवलंबते. त्या व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळतो. हा काळ त्याच्यासाठी भरपूर निर्णयात्मक ठरतो. ती व्यक्ती घरातील ज्या सदस्याला सर्वात जवळचे मानते त्याच्याकडूनच जास्त त्रास झाल्याने ती व्यक्ती भरपूर खचून जाते.

त्यामुळे जबरदस्ती केलेल्या ब्रेकअप चे दुःख कोणाशी शेअर करण्यासाठी किंवा मन मोकळ करण्यासाठी त्याची इच्छा होत नाही. यामुळे ती व्यक्ती हळूहळू परिवारासोबत दूर जाऊ लागते. असे झाल्यानंतर परिवार त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे भरपूर पस्तावतात.

सन्मान आणि सुख – परिवारातील एखादा सदस्य जर प्रेमात पडला असेल तर ती व्यक्ती सुद्धा मॅच्युअर आणि एडल्ट आहे हे परिवाराने विसरून चालणार नाही. अशा त्या व्यक्तीवर स्वतःच्या इच्छा लादू नये. तर त्याच्या आवडी-निवडींचा सन्मान करावा. जर ती व्यक्ती एखाद्या सोबत नात्यात असेल तर त्यांच्या नात्याला सरळ विरोध न करता सर्वप्रथम त्याच्या पार्टनर बाबत माहिती जाणून घ्या. जर ती व्यक्ती त्याच्या रिलेशनशिप’मध्ये खुश असेल तर पुढे त्याच्या वैवाहिक जीवनातसुद्धा सुखी होऊ शकते ही बाब लक्षात घ्यावी.

विनाकारण गॉसिप करू नये – जेव्हा घरातील एखाद्या सदस्याचे रिलेशन घरात कळते तेव्हा त्यांच्या नात्याबाबत घरातील इतर नातेवाईकांमध्ये कुजबुज चालू होते. बाहेरील व्यक्ती किंवा दूरच्या नात्यातील व्यक्ती विनाकारण या गोष्टींवर गॉसिप करत असेल तर हा आमचा फॅमिली मॅटर आहे असे सांगून परिवारातील सदस्यांनी तो विषय थांबवावा. व स्वतः सुद्धा बाहेर या गोष्टींवर चर्चा करू नये. यामुळे तुमच्या परिवारातील संबंध दृढ होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *