बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*नंतर बॉलिवूडमधील ड्र*ग्स कनेक्शन समोर आले. त्यामुळे इंडस्ट्रीतील वेगवेगळ्या कलाकारांवर ना*र्को*टि*क्स कं*ट्रो*ल ब्यु*रो म्हणजेच एन सी बी ची टीम कारवाई करत आहे. नुकतेच या प्रकरणी भारताची लाफ्टर क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचीया यांच्या घरात ड्र*ग्स आढळून आल्यामुळे त्यांना अटक केली होती.

हे दोघे काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आले. मात्र भारती सिंह, हर्ष लिंबाचीया आणि दीपिका पादुकोण ची मॅनेजर करिश्माला जामीन मिळवून देणाऱ्या दोन एन सी बी अधिकाऱ्यांना नि*लं*बि*त करण्यात आले. या दोन्ही अधिकाऱ्यांचे नि*लं*ब*न करण्यात आले कारण, सुनावणीच्या वेळी ते दोघेही अधिकारी अनुउपस्थीत होते. जामीन मिळवून देण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली या दोन अधिकाऱ्यांचे मुंबई एन सी बी ने निलंबन केले आहे.

या दोन अधिकाऱ्यांना नि*लं*बि*त केल्यावर आता एन सी बी च्या वकिलांवर सुद्धा सं श य घेतला जात आहे. कारण ज्या वेळेस या बॉलिवूड कलाकारांच्या जामिनावर सुनावणी चालू होती त्यावेळेस वकील कोर्टात हजर नव्हते. वकील कोर्टात हजर नसल्यामुळे एन सी बी ची टीम कोर्टासमोर स्वतःची बाजू मांडू शकली नाही. त्यामुळे या कलाकारांना आरामात जामीन मिळाला. त्यामुळे या दोन्ही प्रकरणात आता तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी एन सी बी च्या टीमने कॉमेडियन भारती सिंह च्या घरी छा*पा मारून ८६.५ ग्राम गां*जा ज*प्त केला होता. त्यानंतर भारतीय सिंह आणि तिच्या पतीला २१ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. त्यानंतर भारतीने कोर्टात जामीनाची मागणी केल्यावर तिला व तिच्या पतीला १५-१५ हजार रुपयांचा दं’ड भरून सहज जामीन देण्यात आला.

यामागील मुख्य कारण म्हणजे कोर्टात सुनावणीच्या वेळी एन सी बी चे वकील हजर नव्हते त्यामुळे कोर्टात एन सी बी ची बाजू मांडली गेली नाही. अशीच घटना अभिनेत्री दीपिका पादुकोण ची मॅनेजर करिश्मा प्रकाश च्या बाबतीत सुद्धा घडली होती. करिष्मा प्रकाश च्या घरुन एन सी बी च्या टीमने १.७ ग्राम हॅ*श ज*प्त केला होता. यासाठी करिश्माला अटक सुद्धा केली.

जेव्हा करिश्माने जामिनासाठी अर्ज केला त्यावेळेस एन सी बी चा कोणताही वकील कोर्टात हजर राहिला नाही त्यामुळे कोर्टाने करिश्माचा जामीन लगेच मंजूर केला. मिळालेल्या माहितीनुसार एन सी बी ने एन डी पी एस कोर्टात यासंबंधी याचिका दाखल केली आहे.

सुशांत सिंह राजपूत चे आ*त्म*ह*त्ये नंतर बॉलिवूडमधील ड्र*ग्स कनेक्शन समोर आल्यावर आतापर्यंत अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान यांची चौकशी केली गेली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *