बॉलीवूड असे क्षेत्र आहे, जिथे अनेक चित्रपट सुपरहिट ठरतात तर काही चित्रपट फ्लॉप सुद्धा होतात. या सुपरहिट चित्रपटामुळे चित्रपटातील कलाकार यांना रातोरात प्रसिद्धी मिळते आणि काही असे सुद्धा कलाकार आहेत, त्यांच्या जोडीला नावाजले जाते व त्यांच्या अभिनयाची, कार्याची दाद दिली जाते. अशीच एक जोडी बॉलिवूडमध्ये काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध होती ती म्हणजे आमीर खान आणि जुही चावला यांची.

या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला त्यांनी साकारलेल्या अभिनयाद्वारे चित्रपटाला चार चाँद लागत होते परंतु एकदा असे काही घडले ज्यामुळे ही जोडी विभागून गेली आणि भविष्यात पुन्हा कधीच आपल्याला पाहायला मिळाली नाही. हो, खरंच विश्वास नाही बसत नाही तर आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये अशीच काही महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल !

बॉलीवुड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री जुही चावला यांनी एकत्र बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ आमिर आणि जुही चावला यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता आणि आपल्या या पहिल्याच चित्रपटाने हंगामा माजला होता, त्यानंतर ही जोडी आपल्याला अनेक चित्रपटांमध्ये दिसली परंतु नंतर असे काय झाले चित्रपट ‘इश्क’ नंतर हे दोन्ही कधीच मोठ्या पडद्यावर एकत्र आपल्याला दिसले नाही.

खरंतर नुकताच चित्रपट इश्कला प्रदर्शित होऊन २८ वर्षे पूर्ण झाले. हा चित्रपट २८ नोव्हेंबर १९९७ देशभरात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

या चित्रपटांमध्ये आमीर आणि जुही यांच्याशिवाय अजय देवगन व काजल सुद्धा प्रमुख भूमिकेमध्ये होते. आता तुम्ही विचार करत असाल की नेमके असे काय झाले जे ‘इश्क’ चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा आपल्याला पडद्यावर दिसली नाही ?

खरंतर चित्रपट इश्क ची शूटिंग चालू होती तेव्हा आमिरने जुहीसोबत अशी मजाक मस्ती केला की त्यांच्या नात्याला भारी पडले. माध्यमांच्या अहवालानुसार मानले तर सेटवर आमिरने जुही चा हात मागितला आणि त्याला ज्योतिषशास्त्राची माहिती आहे असे सांगितले मग जुहीने सुद्धा आपला हात दाखवण्यासाठी आमीर कडे दिला परंतु आमिरने जुहीच्या हातावर थुंकले.

जुहीला आमिरची मस्करी अजिबात आवडली नाही, त्यामुळे ती खूपच नाराज झाली. आमिरच्या या मस्करीमुळे जूही चित्रपट सोडण्यास सुद्धा तयार झाली होती परंतु नंतर कसेतरी चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली. आमीर आणि जुही चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघे एकमेकांना पासून वेगळे राहू लागले आणि हा सिलसिला एकंदरीत पाच वर्ष चालला.

जुहीने पाच वर्षापर्यंत आमिर सोबत बातचीत सुद्धा केली नाही मग प्रकरण शांत झाले आणि दोघे एकमेकांशी बोलू लागले. खरंतर ही घटना घडल्यानंतर दोघे कधीच एकत्र कोणत्या चित्रपटात मध्ये पुन्हा दिसले नाही. यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास आमिर ने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

उदाहरणार्थ गजनी, सिकंदर, मन, थ्री इडीयट्स, तारे जमीन पर, दंगल इत्यादी, त्याचबरोबर जुही चावला ने आतापर्यंत कयामत से कयामत, इश्क, अठन्नी आमदनी खर्चा रुपया यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *