कोणाचे नशीब कधी चमकेल हे आपण सांगू शकत नाही. पण काही वेळेस एखाद्या विशिष्ट व्यक्तिसोबत काम केल्यास त्या व्यक्तीला प्रसिद्धी मिळते याची हमी आपण देऊ शकतो. बॉलीवूड मध्ये येऊन आपले नाव मोठे करण्याची प्रत्येकाची इच्छा असते मात्र प्रत्येकाच्या नशिबात ते असतेच असे नाही. काहीजण या इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या अभिनयाच्या जोरावर तर काही त्यांच्या गॉडफादरचा जोरावर टिकतात.

इंडस्ट्रीमध्ये अभिनेता सलमान खानला गॉडफादर मानले जाते. कारण पदार्पणाच्या चित्रपटातच जर सलमान खान सोबत काम करण्याची संधी मिळाली तर त्या अभिनेत्रीचे नशीब चमकते याला इतिहास साक्षी आहे. आतापर्यंत सलमान खानने अनेक अभिनेत्रींना इंडस्ट्रीमध्ये स्थिर होण्यास मदत केली आहे.

सलमान खान सोबत तेरे नाम या चित्रपटामध्ये लॉन्च झालेली अभिनेत्री भूमिका चावला ही सुद्धा अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे. भूमिका चावलाने तेरे नाम सारख्या मोठ्या व सुपरहिट चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते मात्र काही हिट चित्रपट केल्यानंतर ती इंडस्ट्री मधून गायब झाली. चला तर जाणून घेऊ आजकाल नक्की कुठे आहे भूमी चावला.

अभिनेत्री भूमिका चावला आता ३९ वर्षांची झाली असून २१ ऑगस्ट १९७८ मध्ये दिल्लीतील एका पंजाबी परिवारात तिचा जन्म झाला होता. भूमिकाने दिल्ली मधूनच तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे वडील आर्मी ऑफिसर होते. दिलीप आणि बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये काम केले मात्र कालांतराने तिला हवी तशी ओळख तयार करता आली नाही. भूमिका १९९७ मध्ये मुंबईत आली. त्यानंतर तिने काही जाहिराती व हिंदी म्युझिक व्हिडिओ अल्बम मध्ये काम केले. यासोबतच ती हिप हिप हुर्रे या टीव्ही सिरीज मध्ये पण दिसली होती.

भूमिका ने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात तेलगू इंडस्ट्री पासून केली होती. तिने २००० मध्ये आलेल्या युवाकुडू या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर २००१ मध्ये कुशी चित्रपटात पवन कल्याणच्या अपोजिट काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवले. या चित्रपटासाठी भूमिकेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
त्यानंतर भूमिका ने २००३ मध्ये सलमान खान सोबत तेरे नाम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

त्यावेळी हा चित्रपट त्यावर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सहभागी झाला. याव्यतिरिक्त भूमिका ने पंजाबी व तमिळ चित्रपटांमध्ये पण काम केले आहे. त्यानंतर भूमिका ने २०१६ मध्ये आलेल्या एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात धोनीच्या बहिणीचे काम केले होते. तेरे नाम चित्रपटानंतर भूमिका ला अनेक अवॉर्ड्स इव्हेंटमध्ये बेस्ट डेब्यू इन बॉलिवूडचा अवॉर्ड मिळाले.

या चित्रपटानंतर भूमिका ने रन, दिल ने जिसे अपना कहा, सिलसिले, दिल जो भी कहे या चित्रपटांमध्ये काम केले मात्र हे चित्रपट भूमिका ला तेरे नाम चित्रपटासारखी ओळख देऊ शकले नाही. २००७ मध्ये भूमिका ने तिचा बॉयफ्रेंड भरत ठाकूर सोबत लग्न केले. भरत ठाकूर हे योगा टीचर आहेत.
या दोघांनी नाशिक येथील गुरुद्वार मध्ये लग्न केले. भूमिका भरतकडे योगा शिकायला जायची. असे म्हटले जाते की भूमिका व भरतने एकमेकांना चार वर्षे डेट केले व त्यानंतर लग्न केले. २०१४ मध्ये यांना मुलगा झाला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *