लग्न म्हटलं की, नाच, गाणं, धमाल. पण या कोरोनाच्या काळात ना कोणाशी भेट झाली ना मजा मस्ती ना नाच ना धमाल. सर्वच या कोरोनामुळे भयभीत जीवन जगात होते. पण जस जस हळूहळू आता सर्व गोष्टी पूर्ववत होत आहेत. तशी ज्यांची लग्न या कोरोनामुळे रद्द झालेली ती लग्न सध्या होताना दिसून येत आहेत. कमी माणसांच्या उपस्थितीत का होईना पण ठरलेले समारंभ लोक आटपत आहेत.

आजकाल नवरा-नवरी ने लग्नमंडपात हटके एन्ट्री करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. काही वेळेस नातेवाईक खास डान्सने नवरा-नवरीचे स्वागत करताना दिसतात. साखरपुड्यापासून ते अगदी लग्नापर्यंत नवरा-नवरी किंवा दोघेही डान्स करतानाचे अनेक व्हिडिओज तुम्ही यापूर्वी पाहिले असतील. असाच एक धम्माल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरी मुलगी धमाकेदार डान्ससह लग्नमंडपात एन्ट्री करताना दिसत आहे.

आपलं लग्न हे प्रत्येक मुलीच स्वप्न असतं. आपल्या सर्व इच्छा, सर्व हौस मौज तिला पूर्ण करायची असते. लग्नाच्या साड्या, त्यावरचे दागिने, मेकअप, मेहंदी, चपला सगळं काही नवीन आणि सूट होणारं हवं असतं. पण एक गोष्ट आपण सगळेच लहानपणापासून बघत आलो आहोत ती म्हणजे नवरी मुलगी ही नेहमी नाजूक, लाजणारी आणि शांत अशीच आपल्याला सर्व लग्नांमध्ये दिसते.

आजकालच्या या जगातील नवरी लाजण्या बावरण्यासोबत आपली हौस पूर्ण करण्याला ही तितकंच प्राधान्य देते याच उदाहरण म्हणजे गेले काही दिवस एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये नवरी मुलगी नाचत मंडपात एंट्री करत आहे. मराठमोळी साडी, त्यावर सुंदर दागिने घालून आणि उपरणं घेत, डोळ्यांवर गॉगल लावत मेरे सैया सुपरस्टार या गाण्यावर नाचत तिने मंडपात एन्ट्री घेतली आहे. ३० नोव्हेंबरला संकेत शिंदे सोबत श्वेता ताजनणे हीच लग्न झालं.

हा व्हिडीओ आहे जुन्नर मधील श्वेता ताजणे – शिंदे हिचा. ती मूळची जुन्नरची आहे परंतु ती कळवा, ठाणे येथे राहते. मनकर फाटा, उदापूर या ठिकाणी त्या दोघांचं लग्न झालं. लग्नामध्ये नाचण्यामागे तीच प्रसिद्धी मिळवणं असं काही उद्दिष्ट नव्हत. फक्त होणाऱ्या नवऱ्याला खुश करण्यामागचा एक हेतू होता, असं ती म्हणाली. तो एक आनंदाचा क्षण होता आणि आयुष्यात लग्न एकदाच होतं, त्यामुळे तिच्या सर्व इच्छा तिला पूर्ण करायच्या होत्या.

संकेत हा फोटोग्राफर आहे आणि आपल्या होणाऱ्या बायकोचा डान्स पाहून तो भारावून गेला. माझ्या बायकोने माझ्यासाठी हा डान्स केला हे पाहून मी खूप खुश झालो अशी त्याने प्रतिक्रिया दिली. आपल्या नवऱ्याचं मन जपणारी आणि आपल्या नवऱ्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न अगदी लग्नापासूनच करणाऱ्या नववधूला आमचा सलाम !

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध कमेंट्स येऊ लागला. काहींनी तिचे कौतुक केले. तर काहींनी त्याला नापसंती दर्शवली. साधारणपणे आपल्याकडे मुलींनी लग्नात लाजलं पाहिजे, अशी मानसिकता आहे. त्यामुळे अशा मानसिकतेच्या लोकांना या मुलीचा हा बिनधास्तपणा नक्कीच भावला नसेल. परंतु, असो. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण. ते कसे एन्जॉय करायचे याचे स्वातंत्र्य आपल्याला असायला हवे.

तिचा हा डान्स सर्वांसाठीच अगदी सरप्राईज ठरला. तिच्या नवऱ्याला देखील या तिच्या धमकदार एंट्री बद्दल कल्पना नव्हती. नवऱ्याने तर तिचा हा डान्स बघून अक्षरशः तिची दृष्टच काढली. आपल्या इच्छा पूर्ण करत नवऱ्याचं कौतुक करणारी आणि मनमुराद जगणाऱ्या या नवऱ्या मुलीला शुभेच्छा. या नवदांपत्याला बॉलिरिपोर्ट टीम कडून भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *