बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनयाची छाप पाडत प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. मिस वर्ल्ड हा किताब पटकवणारी प्रियांका ही ५वी भारतीय महिला आहे. प्रियांकाने २०१८ मध्ये १ व २ तारिखला वेगवेगळ्या रितीरिवाजामध्ये अमेरिकन गायक व अभिनेता निक जोनस याचसोबत लग्न केले. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी हे लग्न केले. हे दोघे ही सोशल मीडियावर फार सक्रिय असतात.

प्रियांका व निक त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत. प्रियांकाने पती निक जॉनसच्या काही सवयींचा खुलासा केला आहे. प्रियंकाने तिच्या लग्नानंतर दिलेल्या मुलाखतीत देखील निक जोनससंबंधी काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

निक जोनस सकाळी उठल्यावर बेडरूममध्ये पहिली ही गोष्ट करतो, त्याची एक वेगळीच सवय असल्याचे प्रियांकाने सांगितले. निकची ही रोमँटिक सवय ऐकून तुम्ही ही थोडे चकित व्हाल. प्रियांका चोप्रा म्हणाली होती की तिचा नवरा तिच्याकडे नेहमीच खूप आकर्षित असतो आणि दररोज तो पहाटे उठून आधी तिचा चेहरा पाहतो.

अभिनेत्री म्हणाली होती, “हे थोडे विचित्र असू शकते पण निक जोनास दररोज सकाळी उठून माझा चेहरा पाहतो, ” एका मजेदार पद्धतीने प्रियंका पुढे म्हणाली, “जेव्हा निक मला असं बघत असतो, तेव्हा मी म्हणते की एक मिनिट थांब, मी थोडा मेकअप करते.” यानंतर प्रियांका म्हणाली, ” जेव्हा मला निक बघत असतो मला थोडं वेगळंच वाटतं आणि मी इतकच बोलते की आता मला झोप येते आहे,

आणि नेहमी निक माझ्या अर्धंझोपेत असणाऱ्या त्या डोळ्यांकडे पाहून बोलतो, फार अदभूत आणि सुंदर…. हे थोडं विचित्र वाटतं, पण जर त्याला आवडत आहे तर ठीक आहे. निक मला नेहमी म्हणतो की थांब मला तुला पाहू दे. मी मस्करी करत नाही आहे, पण खर्च हे फार अद्भुत वाटतं मला….” या व्यतिरिक्त प्रियांका निकचे अनेक खुलासे करत असते.

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी २०१८ मध्ये जोधपूर मधील उमेड भवन पॅलेस येथे शाही लग्नसोहळा केला होता. पूर्ण उमेड भवन पॅलेस चार दिवसांसाठी बुक करण्यात आले होते. या ४ दिवसांमध्ये बाहेरील इतर कोणत्याही व्यक्तीस उमेड भवन पॅलेसमध्ये येण्यास परवानगी नव्हती. १ व २ डिसेम्बर भारतीय तसेच पाश्च्यात्य अशा दोन्ही लग्न पद्धतींमध्ये ते विवाह बंधनात अडकले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *