बॉलिवूडचा सदाबहार अभिनेता अनिल कपूर अनेकदा त्याच्या हटके भूमिकांमुळे चर्चेत असतात. अनिल कपूर भूमिका साकारत असलेल्या चित्रपटांमध्ये कधीच त्यांचे वय समजून येत नाही. आज देखील त्यांचा अभिनय हा तितकाच जोशपूर्ण असतो. आता पुन्हा एकदा अभिनेता अनिल कपूर त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवण्यास सज्ज झाले आहे. लवकरच त्यांचा एके वर्सेस एके हा चित्रपट प्रदर्शित होईल.

मात्र प्रदर्शन आधीच अनिल कपूरचा चित्रपट ‘एके वर्सेस एके’चा ट्रेलर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलर मध्ये इंडियन एअरफोर्स च्या वर्दीत अनिल कपूर अनुराग कश्यपला गोळ्या मा’र’त आहे. या सीन वर आय ए एफने मीडियावर नाराजी व्यक्त केली. आणि चित्रपटामधून तो सीन काढावा अशी मागणी केली. या सर्व प्रकारामुळे अनिल कपूर आणि नेटफ्लिक्सला आय ए एफ ची माफी मागावी लागली.

हवाई दलाने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, की या व्हिडिओमध्ये आयएएफच्या वर्दीचा चुकीचा वापर केला गेला आहे. तसेच यामध्ये ज्या भाषेचा वापर केला आहे ती भाषा सुद्धा या वर्दी साठी योग्य नाही. ही गोष्ट भारताच्या सशस्त्र बळाच्या व्यवहारा संबंधित अपमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे चित्रपटातून यासीनला लवकरात लवकर काढण्यात यावे.

आय ए एफ च्या अपमानाचा कोणताच हेतू नव्हता – अनिल कपूर बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर ने सोशल मीडियावर या प्रकरणी माफी मागत म्हटले की, भारतीय वायुसेनेच्या अपमान व्हावा असा माझा हेतू नव्हता. माझे कॅरेक्टर हा एक अभिनेता असल्यामुळे त्याला युनिफॉर्म दिला होता. जो चित्रपटामध्ये एक अभिनेता असून ऑफिसरची भूमिका करत होता.

त्या पात्राची मुलगी कि’ड’नॅ’प झालेली असते. त्यामुळे ते पात्र रागात तेच दाखवतो जे सर्वसामान्य आयुष्यात एक भावुक वडील व्यक्त करतात. तरीही अजाणतेपणे तुमच्या भावनांना दुखावल्याबद्दल मी तुमची माफी मागतो.

याप्रकरणी नेटफ्लिक्स ने सुद्धा सोशल मीडियावर एक नोट लिहत माफी मागितली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, भारतीय सेनादलाचा किंवा त्या संबंधित कुठल्याही गोष्टीचा अपमान होईल असा आमचा कधीच हेतू नसतो. या चित्रपटाच्या गोष्टीत अनिल कपूर ची मुलगी सोनमला अनुरागने कि’ड’नॅ’प केलेले असते.

त्यामुळे अनिल कपूर संपूर्ण शहरात त्याच्या मुलीला शोधताना या चित्रपटात दिसतो. या चित्रपटाचे ट्रेलर ८ डिसेंबरला रिलीज केले गेले. हा चित्रपट २४ डिसेंबरला नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या ट्रेलर च्या रिलीजपूर्वीच अनुराग अनिल यांचे सोशल मीडियावरील वॉ’र चर्चेत होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *