बॉलिवूडच्या दुनियेत अनेक एकापेक्षा एक हरहुन्नरी अभिनेते होऊन गेले.यामध्ये शशी कपूर हा प्रसिद्ध अभिनेत्याच्या रुपात बघण्यात आला आहे. त्याचा ‘मेरे पास मा है’ हा डायलॉग आजही खूपच फेमस आहे. शशी कपूर हे त्यांच्या वेळेच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत.

शशी कपूर जेव्हा हे जग सोडून गेले तेव्हा सर्व देशावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. यावरूनच आपल्या लक्षात येते की ते किती फेमस होते. आजही आपण त्यांचा एखादा चित्रपट बघायला बसलो तर पूर्ण चित्रपट पाहिला खेरीज उठत नाही.
शशी कपूर यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षीच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांच्या परिवारातील ते एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांनी परदेशी मुलीशी लग्न केले आहे. त्यांनी ‘जेनिफर केंडल’ शी लग्न केले व त्यांना तीन मुले आहेत. आज आम्ही तुम्हाला शशी कपूर ची नात ‘आलिया कपूर’च्या बद्दल सांगणार आहोत;जी सौंदर्याच्या बाबतीत एखाद्या अभिनेत्रीला देखील मागे टाकेल.
आलिया ‘शशी कपूर’ यांचा मुलगा ‘करण कपूर’ यांची मुलगी आहे.जरी आलिया चित्रपट सृष्टी पासून लांब असली तरी सौन्दर्याचा बाबतीत ती एखाद्या अभिनेत्रीला देखील लाजवेल. आलिया आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये राहते.आलियाचे वडील करण कपूर यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी ठरला.
असं म्हणायला काही हरकत नाही की आलिया देखील चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल टाकेल आणि आपल्या आजोबांप्रमाणे नावलौकिक मिळवेल. तुम्हाला सांगायला हरकत नाही कि आलियाचे सोशल मीडियावर जबरदस्त फोल्लोवर्स आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *