टीव्हीवरील नामांकित अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला सर्व जण ओळखतात. ‘ये हे मोहब्बते’ या मालिके मधून ती घराघरात पोहोचली. पण तुम्हाला माहित आहे का तिला एक बहीण सुद्धा आहे. आणि दिव्यांका ची बहिण हि तिच्याहून खुप सुंदर आहे. तिने चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तुम्हाला जाणून हैराणी होईल पण दिव्यांका च्या बहिणीने चित्रपटसृष्टीत चक्क ऋतिक रोशन सारख्या सुपर स्टार सोबत पदार्पण केले. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अग्निपथ या चित्रपटात ऋतिकच्या बहिणीचे पात्र साकारलेली कनिका आहे.

अग्निपथ चित्रपटात कनिका चे पात्र देखील भरपूर छान साकारले होते. प्रेक्षकांनी या पात्राची देखील भरपूर प्रशंसा केली. या चित्रपटात काम करून कनिका तिवारीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. अग्निपथ या चित्रपटात कनिका शाळेत जाणाऱ्या मुलीचे पात्र साकारत होती.

या चित्रपटातील कनिका चे निरागस पात्र प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय ठरले होते. कनिका चा जन्म तसेच शिक्षण भोपाळमध्ये झाले. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यामुळेच स्वतःची आवड जोपासण्यासाठी ती फिल्म सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत आली.

मुंबईत येऊन स्वतःला स्थिर करणे सोपे नाही. मुंबईहून स्वतःसाठी संधी शोधणे आणि त्या संधीचा योग्य फायदा घेणे हे खूप कठीण काम आहे. पण कनिकाने ६०० स्पर्धकांना मागे टाकत अग्निपथ चित्रपटात स्वतःचे स्थान पक्के केले. २०१४ मध्ये ती तेलुगू चित्रपट ‘बॉय मीट गर्ल’ आणि कन्नड चित्रपट ‘रंगन’ मध्ये दिसली. २०१५ मध्ये अवि कुमार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

या चित्रपटात सुद्धा तिने शानदार अभिनय साकारला होता. त्यावेळी ती चित्रपटांमध्ये खूपच निरागस दिसायची. आता मात्र ती खूप सुंदर आणि बोल्ड दिसते. कनिका आता पहिल्या हून अधिक ग्लॅमरस झाली आहे. पण असे असून देखील ती बॉलिवूडपासून दूर राहते. मात्र तरीही ती तिच्या फॅन्स साठी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असते.

अग्निपथ नंतर ती दुसऱ्या कुठल्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसली नाही. मात्र साऊथ मधील अनेक चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. अग्निपथ चित्रपटात शाळेतील मुलीची भूमिका साकारणारी छोटीशी कनिका आता खूप मोठी झाली आहे. ती आता २३ वर्षांची आहे. सोशल मीडिया वर ती तिच्या फॅन्स साठी अनेक फोटो शेअर करत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *