कोणाचे नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही.तोंडात चांदीचा चमचा घेऊन आलेली व्यक्ती कधी ही देशोधडीला लागू शकते तर हालाखीचे जीवन जगून मोठी झालेली व्यक्ती अचानक सोन्याच्या ताटात जेवायला बसू शकते. या सर्व गोष्टी नशीब व त्यांच्या जोरावर मिळू शकतात किंवा हातातून जाऊ शकतात.

आपल्याकडे बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. बॉलीवूड मधील काम करणारे काही कलाकार आधी अगदी हलाखीचे आयुष्य जगायचे मात्र इंडस्ट्रीमध्ये आल्यावर त्यांनी त्यांच्या टॅलेंट च्या जोरावर सर्वांची मने जिंकून घेतली सोबतच बक्कळ पैसा देखील कमवला.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये इतिहास रचणारा चित्रपट ‘बाहुबली’च्या हिंदी वर्जन मध्ये अभिनेता प्रभास चे डायलॉग डबिंग मराठमोळा अभिनेता शरद केळकर ने केले होते. शरद केळकर तानाजी, हाउसफुल ४ या चित्रपटांमध्ये सुद्धा दिसला होता. अभिनेता शरद केळकर चा आवाज प्रेक्षकांना खूप दमदार वाटतो. त्यामुळे शरद केळकरला व्हॉइस डबिंग करण्याचा अनुभव आहे.

बाहुबली चित्रपटादरम्यान दिग्दर्शक राजमौली यांनी शरद केळकर ला प्रभासच्या आवाजाचे डबिंग करायचे आहे असे सांगितले त्यावेळी शरद तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रेक्षकांना शरद केळकर दिल्लीचा वाटतो मात्र तो दिल्लीचा नसून ग्वालियर मधील आहे. तेथेच त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले होते.

शरद केळकर ने सांगितले की महाविद्यालयीन दिवसात त्याची हालत हलाखीची होती त्यामुळे त्याला कधीच महागड्या वस्तू वापरता आल्या नाहीत. त्यामुळे त्यावेळी तो दर विकेंड ला दिल्लीच्या चोर बाजारातून ब्रँडेड शूज आणि कपडे विकत घ्यायचा. त्यावेळी रात्रभर दिल्लीच्या चो’र बाजारात चालावे लागायचे. करीम हॉटेलमध्ये जेवायचा. मी दिल्लीला चांगल्या प्रकारे ओळखत असे शरद ने सांगितले.

त्याची बॉडी लँग्वेज व इतर सवयींमुळे लोकांना तो दिल्लीचा वाटतो असे शरद सांगितले. करियरच्या सुरुवातीला मुंबईतील अधिक तर लोकांना मी दिल्लीलाच वाटायचो. मात्र जेव्हा मी त्यांना सांगायचो की मी मूळचा महाराष्ट्रातील आहे तेव्हा त्यांना यावर विश्वास पटायचा नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *