वातावरण बदललं की लगेचच त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. आधीप्रमाणे ती मऊ, सुंदर राहत नाही. थंडीमध्ये तर त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.थंडी सुरु झाली की चेहरा कोरडा पडायला सुरुवात होते, त्यामुळे ती निस्तेज दिसू लागते. ओठांना देखील याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. चेहऱ्यासोबत शरीराची इतर त्वचा देखील या त्रासातून जाते. मॉयश्चरायझरचा वापर केल्यानंतरही त्यांची त्वचा कोरडीच राहते.
अनेकदा या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. परंतु थंडीमध्ये एवढं पाणी पिणं शक्य होत नाही. हाता-पायाच्या त्वचेला आपण काही वेळेस मॉयस्चराइजर लावू शकतो, पण चेहऱ्यासाठी अनेकदा महागड्या क्रीम विकत घेतल्या जातात. प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्याने काही जणांना या क्रीम सूट होत नाहीत. त्यामुळे नैसर्गिकरित्या आपली त्वचा तजेलदार व सुंदर होण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय केले जातात. पाहुयात तर कोणते आहेत हे उपाय !
कोरफड – कोरफड ही पूर्वीपासूनच औषधी वनस्पती म्हणून प्रचलित आहे. कोरफड मधील गर हा त्वचेला निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी केला जातो. कोरफडीचा फेस पॅक सर्व प्रकारच्या त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. या फेस पॅकमुळे त्वचेवरील सुरकुत्या, मुरुम आणि डागांची समस्या कमी होते. शिवाय चेहऱ्यावर नॅचरल ग्लो देखील येतो. कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक ऍ सि ड यांसारखी पोषक तत्व आढळतात. कोरफडाच्या ह्या विविध गुणांमुळे ह्याचा वापर अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो.
कच्चे दूध – चेहरा सुंदर बनवण्यासाठी आपण कच्च्या दुधाचा वापर करु शकतो. कच्चे दूध चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम यासारखी तत्वे असतात. कच्च्या दुधाचा टोनर म्हणून तेलकट त्वचेसाठी उपयोग होऊ शकतो. यासाठी थोड्याश्या कच्च्या दुधात काही थेंब लिंबाचे रस मिळवा. या मिश्रणाला चेहरा आणि मानेला लावा आणि काही वेळाने गरम पाण्याने धुवा.
खोबरेल तेल – घरगुती मेकअप रिमूव्हल म्हणून अनेकजण खोबरेल तेलाचा वापर करतात. त्यासोबतच बहुतेक घरांमध्ये हिवाळ्यात खोबरेल तेल मॉइश्चरायझर क्रीम म्हणून वापरले जाते. या तेलामुळे त्वचेला अंतर्गत पोषण मिळते. हातापायांसोबत हे खोबरेल तेल चेहऱ्याला देखील आपण लावू शकतो. या तेलामुळे सुरकुत्या कमी होतात, आपला चेहरा ताजा व तरुण दिसतो. हिवाळ्यात रात्री झोपताना खोबरेल तेल चेहऱ्याला लावून झोपावे. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवा. सतत वापरामुळे, लवकरच आपल्याला याचा फरक दिसेल.
मध – त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी मध एक सर्वोत्तम पर्याय आहे. मधात उच्च संभाव्य बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंधात्मक गुणधर्म असतात. त्वचेवरील व त्वचेच्या आतील बॅक्टेरिया मध नष्ट करतो. हळद, पपई, दूध यासारखे पदार्थ आपण मधामध्ये मिसळून त्याचा वापर करू शकतो. हे पदार्थ नैसर्गिक असल्याने या पदार्थांचे कोणतेही साईड इफेक्ट्स आपल्यावर होत नाहीत. अंघोळ करण्यापूर्वी मध, हळद व २-३ लिंबूचा रसाचे थेंब याचे मिश्रण तयार करून चेहऱ्यावर लावून १०-१५ मिनिटांनी स्वच्छ धुवावे.
तूप – तूप एक उत्तम अॅन्टी-एजिंग प्रोडक्ट आहे. हे कोरड्या त्वचेच्या पेशींमध्ये जाऊन त्या हेल्दी करण्यास मदत करतो. त्यामुळे आपोआप त्वचा उजळण्यास मदत होते. तूपासोबत जर हळद आणि बेसन एकत्र केलं तर त्वचेसाठी ते अत्यंत फायदेशीर ठरतं. एक चमचा तूपामध्ये थोडंसं मध एकत्र करा. एका छोट्या कंटेनरमध्ये ठेवा आणि दिवसातून ३ ते ४ वेळा ओठांवर लावा. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावा. त्यामुळे ओठांच्या कोरड्या त्वचेची समस्या दूर होते आणि ओठांवर नैसर्गिक गुलाबी रंग येतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.