बॉलीवूड इंडस्ट्री एवढी मोठी आहे की यामध्ये कधी कोणते कलाकार येतील, कधी कुणाचं कोणावर प्रेम जडेल, कधी कोणाचा ब्रेकअप होईल तर कधी कोणाचं लग्न होईल हे सांगता येत नाही. बॉलीवूड मध्ये अनेक कलाकारांनी त्यांचे नशीब आजमावले त्यापैकी काही जणांनाच स्वतःचे स्थान येथे पक्के करता आले. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे गोविंदा. उत्कृष्ट डायलॉग, जबरदस्त डांस स्टेप्स यामुळे अनेकांना स्वतःची भुरळ पाडायला लावणारा अभिनेता गोविंदा आजही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

गोविंदाची स्टाईल आणि कॉमेडी करण्याचा टाइमिंग आज देखील लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. गोविंदाने अधिक तर विनोदी चित्रपटात काम करून लोकांना हसवण्याचे काम केले. त्याकाळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा त्यांची प्रोफेशनल लाईफ चर्चेत असायची. परंतु आज आम्ही तुम्हाला गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत रहस्य सांगणार आहोत.

गोविंदाच्या आयुष्यात एक असा काळ आला होता त्यावेळी त्याचे वैवाहिक आयुष्य धोक्यात आले होते… अशी कोणती घटना घडली होती त्याच्या आयुष्यात चला जाणून घेऊ ! अभिनेता गोविंदा नेहमीच त्यांच्या कामाप्रती एकनिष्ठ राहिले. त्यांच्या आयुष्यात सर्व काही आलबेल चालू होते. मात्र अशातच त्यांच्या आयुष्यात अभिनेत्री राणी मुखर्जी ची एन्ट्री झाली. राणीचे सौंदर्य आणि निरागसता पाहून गोविंदा तिच्या प्रेमात पडले.

हा काळ तेव्हाच आहे जेव्हा साल २००० मध्ये ‘हद कर दी आपने’ या चित्रपटात या दोघांना एकत्र कास्ट केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांमधील जवळीक वाढत चालली होती. त्याकाळी केवळ गोविंदाच नाहीतर राणी देखील त्यांच्या प्रेमात पडल्याचे म्हटले जाते. असे म्हटले जाते की राणी च्या प्रेमात गोविंदाने भरपूर पैसे उडवले होते.

गोविंदा आणि राणी च्या अफेअर च्या चर्चा गोविंदा च्या पत्नी पर्यंत पोहोचल्या. हे ऐकून सुनिता म्हणजेच गोविंदाची पत्नी आतून पूर्णपणे तुटली. त्यावेळी राणी मुळे सुनिता आणि गोविंदा चे नाते तुटायला आले होते. मात्र गोविंदा राणीशी लग्न करून आपल्या पत्नी सोबत वेगळे होऊ इच्छित नव्हता. त्यामुळे त्याने राणी पासूनचे होण्याचा निर्णय घेतला.

राणी नंतर गोविंदा चे नाव अभिनेत्री रविना टंडन सोबत सुद्धा जोडले गेले होते. रवीनाने गोविंदा सोबत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोठ्या पडद्यावर या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडायची. मात्र रवीना सोबत सुद्धा गोविंदा चे नाते फार काळ टिकले नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *