आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. आजारी पडल्यावर रासायनिक युक्त औषधे सेवन करण्यापेक्षा आयुर्वेदिक औषधांचा वापर करणारी अनेक मंडळी आहेत. आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यापैकीच एक म्हणजे जेष्ठमध. ज्येष्ठमध ही वनस्पती युरोप आणि आशियाच्या बऱ्याच प्रदेशात आढळते.
वेगवेगळ्या पदार्थांमध्ये प्राकृतिक गोडवा आणण्यासाठी जेष्ठमधाचा वापर केला जातो. एंटी सेप्टीक, एंटी-डायबेटिक एंटीऑक्सीडेंट पासून ते श्वसनासंबंधी आजारांशी लढण्यासाठी ज्येष्ठमध फायदेशीर असते.

माय उपचारने दिलेल्या माहितीनुसार , ज्येष्ठमध आत विटामिन बी आणि विटामिन ई चे प्रमाण जास्त असते. त्यामध्ये फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सेलेनियम, कॅल्शियम आणि झिंक यांसारखी खनिजे असतात. याशिवाय जेष्ठमध आत शरीरास आवश्यक असलेले फायटोन्यूट्रीएंट्स आढळतात. जेष्ठमध बाजारात सहज उपलब्ध असते. कोरडे मूळ, पावडर किंवा कॅप्सूल च्या स्वरूपात त्याचे सेवन केले जाते.

श्वसनमार्गातील संक्रमणापासून लढण्यास उपयुक्त – घशातील खवखव, सर्दी, खोकला दमा यांसारखे आजार असतील तर श्वसनाच्या मार्गावर होणाऱ्या संसर्गावर उपचार करण्यासाठी ज्येष्ठमध गुणकारी असते. ज्येष्ठमधात अँटिऑक्सिडंटचे गुण असल्यामुळे ब्रोक्नियल ट्यूब मध्ये आलेली सूज कमी करण्यासाठी जेष्ठमधाचा उपयोग होतो. श्वसन संबंधित आजार व जंतूंशी प्रतिकार करण्यासाठी ज्येष्ठमधाची मदत होते.

पाचन क्रिया सुधारते – पचनक्रिया सुधारण्यासाठी जेष्ठ मध परिणामकारक औषधी वनस्पती आहे. पोट फुगणे सूज आणि पोटात गडबड असणे या सर्वांवर जेष्ठमध एक उत्तम उपाय आहे. ज्येष्ठ मधामुळे भूक वाढते तसेच अपचन कमी होते आणि शरीरातील पोषक तत्वांचे चांगले शोषण देखील होते.

लिव्हर साठी चांगला उपचार – ज्येष्ठमधातील एंटीऑक्सीडेंट गुणामुळे रॅडिकल्स आणि टॉ’क्सि’न मुळे होणारे लिव्हरचे नुकसान थांबते. हेपिटायटीस, कावीळ यांसारख्या आजारांवर देखील जेष्ठमध उपयोगी ठरते. ज्येष्ठमधापासून तयार केलेला चहा प्यायल्याने भरपूर फायदा होतो.

सांध्यामधील सांधेदुखी, सांध्यांना सूज येणे, सांधे आखडणे यांसारखे त्रास होतात. या त्रासापासून सुटका होण्यासाठी ज्येष्ठमधाचा वापर केला जातो. सांध्यामधील दाहक वेदना ज्येष्ठ मधामुळे कमी केली होते. ज्येष्ठमध असलेल्या चहा प्यायल्यास छातीतील जळजळ आणि वेदनांना आराम मिळतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते – ज्येष्ठमध ही औषधी वनस्पती शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. ज्येष्ठमधात असलेले बायो ऍक्टिव्ह गुण शरीरातील कमजोरी थकवा कमी करते तसेच शरीराला त्यामुळे ऊर्जा मिळते. ज्येष्ठमधात असलेले एंटीमायक्रोबियल गुण शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते.

अल्सर सारख्या आजारांसाठी फायदेशीर – ज्येष्ठमधाची पावडर तोंड येणे, ओठांच्या आत मध्ये फोड येणे किंवा तोंडात सूज येणे यांसारख्या त्रासासाठी फायदेशीर ठरते. ज्येष्ठमधात उपस्थित असलेले बायोएक्टिव कंपाऊंड तोंडातील आणि जठरातील अल्सरच्या उपचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ज्येष्ठमधामुळे अल्सर ची जखम लवकर कमी होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *