बॉलिवुड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायचे प्रेमाचे किस्से आपण अनेकदा ऐकले असतील. अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या एकेकाळच्या प्रेमकहाणीचे किस्से व्हायरल होत असतात. एक काळ असाही होता जेव्हा या दोघांच्या नात्याची चर्चा कौतुकाने सर्वत्र व्हायची. सलमान आणि ऐश्वर्याने ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या शुटींग दरम्यान या दोघांची प्रेम कहाणी सुरु झाल्याचे म्हटले जाते. मात्र काही वर्षांनी त्यांची प्रेम कहाणी संपल्याचे म्हटले जाते.

सलमान खानने मा*र*हा*ण केली असे आरोप करत ऐश्वर्याने सलमान खानसोबत ब्रेकअप केला होता. मात्र सलमान खानने मात्र ते सर्व आरोप फेटाळले होते. आता मात्र खुद्द सलमान खानचा भाऊ सोहेल खानने सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल काही खुलासे केले आहेत. सोहेल ने सांगितली की जेव्हा ऐश्वर्या सलमानसोबत फिरायची तेव्हा कित्येकदा ती आमच्या घरी सुद्धा आली आहे. ती आता सलमानबाबत असे बोलत आहे म्हणजे त्यावेळी तिने हे नाते स्विकारले होते का?

ऐश्वर्या सलमानवर किती प्रेम करते हे सलमान खानला जाणुन घ्यायचे होते. मात्र ऐ्श्वर्या सलमानच्या बाबतीत खुप सं’भ्र’मि’त होती. त्यामुळे तिला सलमानसोबत असुरक्षित वाटायचे. सोहेल खानने हे देखील सांगितले कि जेव्हा ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत रिलेशन मध्ये होती तेव्हा सुद्धा ती सलमान खानच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. यामुळेच विवेक ऑबेरॉयसुद्धा ऐश्वर्यावर नाराज असायचा.

ऐश्वर्याने जेव्हा सलमान तिला मा*र*हा*ण करतो असे आरोप केले होते तेव्हा सलमानने हे आरोप खोटे असल्याचे सांगितले. सलमानने सांगितले कि त्याने कधीच ऐश्वर्यावर हातसुद्धा उचलला नव्हता, मी इतका इमोशनल आहे की कोणीही मला मा*रे*ल. जेव्हा जेव्हा मी दुखी असतो तेव्हा मी स्वत:ला नुकसान पोहोचवतो. दुसऱ्यांना माझ्या दुखाचा कधीच त्रास होऊ देत नाही.

सलमान आणि ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतर या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही. ऐश्वर्याने अभिषेक बच्चन सोबत लग्न केले. या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे. मात्र सलमान अजुनही अविवाहीत आहे. ऐश्वर्यासोबत ब्रेक अप झाल्यावर त्याचे अनेकींशी नाव जोडले गेले होते मात्र तरीही सलमानने त्यातल्या कोणाशीच लग्न केले नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *