माणुस कितीही डाएटवर असला तरी थोडा तरी भात खाल्ल्याशिवाय काहींना जेवल्यासारखे वाटत नाही. मग असे लोक नावाला एक चमचा का होईना पण भात खातात. तर काही जण यासाठी स्पेशल डाएट तांदळाचा भात खातात. यामध्ये कडक आहार फॉलो करणारे पण अनेक जण आहेत. ज्यांना भात खाल्ल्यावर आपल्या वजनात कमी जास्त प्रमाणात फरक पडेल अशी भीती असते.
पण काही लोक असेही असतात ज्यांना जेवणात रोज वेगवेगळ्या प्रकारचा भात खाण्याची आवड असते. असे लोक बिर्यानी, फोडणीचा भात, साधा मऊ भात, दही भात असे वेगवेगळे प्रकार खातात. पण तुम्हाला माहित आहे का कि, भात खाणे आरोग्यास हानिकारक असते. अशातच जर तो पांढरा भात असेल तर अजुनच हानिकारक…. तो कसा ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पांढरा भात हा आरोग्यास हानिकारक असतो. त्यापेक्षा अनपॉलिश भात म्हणजे तांबडा तांदूळ असलेला भात खा. हा आरोग्याला चांगला असतो. ब्राउन राइस हे व्हाइट राइसचे प्रथम रुप असते. डॉक्टरांचा नेहमी सल्ला असतो कि थंडीच्या दिवसात किंवा रात्रीच्या वेळी राइस खाऊ नये पण जर तुम्हाला खायचाच असेल तर तुम्ही ब्राऊन राइस खाऊ शकता. यामुळे कोणतेच नुकसान होत नाही.
लहान मुले आणि वयोवृद्धांना पांढरा भात देऊ नये – पांढऱ्याभाता मुळे कफ होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे हा भात मुले आणि मोठी माणसे या दोघांनासुद्धा हानिकारक असतो. लहान मुले आणि अस्थमाचा त्रास असलेल्या रुग्णांना भाता देऊ नये. तसेच शक्यतो थंडीच्या दिवसात पांढरा भात खाणं टाळवं.
वजन वाढते – पांढऱ्या भातामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो खाल्यावर वजन वाढते. काहीवेळेस भात आवडल्यास आपण तो थोडा थोडा करत जास्त खातो आणि आपण तो किती खाल्ला हेच आपल्या लक्षात येत नाही. यामुळे वजन वाढते.जे लोक शारिरिक मेहनत करतात अशांनी भात खाल्ला तर चालतो पण ज्यांचे काम बसुन असते अशा व्यक्तींनी शक्यतो भात खाणे टाळावे.
मधुमेह असणाऱ्यासाठी – ज्या लोकांना डायबेटीस सारखे आजार असतात अशांनी तर पांढरा भात बिलकुल खाऊ नये. जर तुम्ही खुप प्रमाणात पांढरा भात खात असाल तर तुमच्या र*क्तातील शुगर लेवल वाढु शकते. या भाता मध्ये प्रोटीनस् पेक्षा कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे र*क्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी तर पांढरा भात हा विषासमान असतो.
प्रोटीनची कमतरता – शरीराला आवश्यक ते प्रोटीन्स या पांढऱ्या भातामधुन मिळत नाही. त्यामुळे जे लोक त्यांच्या आहारामध्ये केवळ भात खातात त्यांना प्रोटीनची कमतरता होते. पांढऱ्या भातामुळे स्वेलिंग वॉटर रिटेंशन हा आजार होतो. यामुळे शरीराला सुज येते. मानवी शरीराला जास्त स्टार्च हानिकारक असते. त्यामुळे ब्ल*डप्रेशर असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा पांढरा भात हानिकारक असतो. या भातामध्ये फायबरचे प्रमाण खुप कमी असते.
त्यामुळे कफ होण्याची शक्यता अधिक असते. हा भात पचायला खुप अवघड जातो. त्यामुळे कफ अजुनच वाढतो. बदलत्या ऋतुमुळे ज्यांना एलर्जी होते अशा व्यक्तींनी सुद्धा पांढरा भात खाऊ नये. यासाठी ऑप्शन म्हणुन त्यांनी ब्राऊन राइस खावा. खासकरुन ज्यांना एलर्जीमध्ये खाज उठते अशांनी तर पांढरा भात खाणे पुर्णपणे टाळावे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.