करोडोची मालमत्ता असणारे भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी व नीता अंबानी हे एक उद्योगपती आहेत. नीता अंबानी या सुद्धा आयपीएल आणि विविध सामाजिक कामामुळे चर्चेत असतात. मात्र, आकाशसह ईशा व अनंत ही त्यांची मुले लाईमलाईटपासून दूर असतात. सोबतच ते त्यांच्या विविध संस्थांशी संबंधित कार्यांसाठी देखील ओळखले जातात.

फोर्ब्स मॅगझिनच्या मते, मार्च २०१९ पर्यंत तो जगातील सर्वात श्रीमंत आशियाई आणि 13 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्सच्या माध्यमातून, त्यांनी इंडियन प्रीमियर लीग फ्रॅंचाईजी मुंबई इंडियन्स संघाचे  मालक देखील आहेत आणि भारतातल्या फुटबॉल लीगचे इंडियन सुपर लीगचे संस्थापक आहेत. २०१२ मध्ये, फोर्ब्सने त्याला जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा मालक म्हणून नामांकित केले.

सोबतच अचानक उद्भवलेल्या या कोरोनाच्या काळामध्ये मुकेश अंबानी यांनी ४५८ करोड इतके रुपये दान केले. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की मुकेश आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानीला शाळेतले मित्र “तु अंबानी आहे की भिकारी” असं चिडवत असत आणि ही माहिती खुद्द नीता अंबानी यांनी एका मासिकाच्या मुलाखतीमध्ये दिली.

या मुलाखतीमध्ये ते अनंत अंबानी च्या शाळेतील किस्सा सांगताना म्हणाल्या, ” जेव्हा माझी मुलं लहान होती शाळेत जात असत, शाळेच्या कॅंटीनमध्ये खर्च करण्यासाठी मी त्यांना दर शुक्रवारी पाच रुपये देत असे. एके दिवशी आनंद अंबानी नीता अंबानी यांच्या बेडरूममध्ये धावत गेले आणि त्यांना म्हणाला की, मला ५ रुपयांच्या ऐवजी १० रुपये हवे आहेत.

जेव्हा त्याला विचारलं तू असं का म्हणतो आहे तेव्हा तो म्हणाला, माझ्या शाळेतले मित्र माझ्याकडे पाच रुपयाचा नाव बघून माझ्यावर हसतात आणि म्हणतात “तू अंबानी आहेस की भिकारी?” आणि हे ऐकताच नीता अंबानी आणि मुकेश अंबानी जोरजोरात हसू लागले.

नीता अंबानी यांनी सांगितले की, मी आणि मुकेश नेहमी मुलांना एक साधारण व्यक्ती म्हणून जगण्याची शिकवण दिली आहे. त्यांना या गोष्टीची कधी जाणीव करून दिली नाही किती ते किती श्रीमंत आहेत. त्यांना कोणतीही गोष्ट फार सहजासहजी मिळू शकते, त्यांना मागेल ते हवं ते त्यांना मिळू शकतं यापेक्षा चांगले शिक्षण घेऊन खूप मेहनत करून जिद्दीने पैसा कमवायचा असतो, त्यांना ही गोष्ट कळणं खूप गरजेचं होतं.

यासोबतच नीता अंबानी त्यांनी हेही सांगितले की त्यांची मुलगी जेव्हा अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेली होती तेव्हा तिथे ती डॉर्मेटरी मध्ये राहत असे, डॉर्मेटरीमध्ये ईशा सोबत अनेक मुली तिच्या सोबत तिथे राहत असत. रूम सोबतच वॉशरूम, खाणं पिणं त्या मुलींसोबतच ती शेयर करत असे. सुट्ट्यांमध्ये नीता अंबानी कधीच मुलांना आणण्यासाठी खाजगी विमानाने जातं नसतं. मुलांना घेण्यासाठी त्या नेहमी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करत असतं.

भावी आयुष्यात ‘चांगला माणुस’ म्हणून त्यांची ओळख व्हावी यासाठी दोघेही नेहमी प्रयत्नशील असतात. सर्वसामान्य आईप्रमाणेच नीताही त्यांच्या मुलांचा सांभाळ करतात हे ऐकून अनेका ते खरं वाटत नाही. पण हे सत्य आहे. ग र्भ श्रीमंतांच्या मुलांचा सांभाळ असाही देखील होऊ शकतो हे वाचून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण नेहमी “बडे बाप बिगडी हुई औ’ला’द” हे वाक्य आपण म्हणतो ते यांना बिलकुल साजेसं नाही. आपली मुले डाऊन-टू-अर्थ राहिली पाहिजे यासाठी कटाक्षाने त्यांचा प्रयत्न राहिला आणि त्यात त्यांना यशही आल्याचे दिसते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *