बॉलीवूड इंडस्ट्री ही ग्लॅमरने भरलेली आहे. पण या सोबतच बॉलिवूडमध्ये असे अनेक रहस्य आहेत जी कालांतराने समोर येतात. काही वेळेस तर खूप वर्षांनंतर असे काही खुलासे होतात ज्याचा अंदाज आपण लावू सुद्धा शकत नाही. आज या पोस्ट द्वारे आम्ही असा एक खुलासा करणार आहोत तो कदाचित तुम्ही कधीच ऐकला नसेल. आम्ही बोलत आहोत ते सनी देओल आणि माधुरी दीक्षित बद्दल.
जे एकेकाळी इंडस्ट्रीमधील नामांकित आणि टॉपचे कलाकार होते. जिथे एकीकडे अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षित टॉप च्या सुपरस्टार पदी होती तर अभिनेत्यांच्या यादीत सनी देओल सुद्धा टॉप चा अभिनेता होता. पण आज देखील हा प्रश्न कायम आहे की दोघेही एवढे सुपरस्टार असून सुद्धा केवळ एकाच चित्रपटात एकत्र का दिसले?
माधुरी दीक्षित आणि सनी देओलने त्रिदेव या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर सुपरहीट ठरला होता. राजीव राय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातील ‘मै तेरी मोहब्बत में’ हे गाणे आज देखील प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सनी आणि माधुरी ची जोडी सुपरहिट ठरली होती.
मात्र तरीही या चित्रपटाला एवढे यश मिळून सुद्धा यानंतर दोघे मोठ्या पडद्यावर कधीच एकत्र दिसले नाहीत. कारण त्याकाळी माधुरी दीक्षित चे चित्रपट हे अधिक तर अभिनेता अनिल कपूर सोबत असायचे. त्याकाळी माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर ही जोडी सुद्धा सुपरहिट होती. याउलट अनिल कपूर आणि सनी देओल यादों अभिनेत्यांमध्ये चुरशीची स्पर्धा असायची. असे म्हटले जाते कि अनिल कपूरला सुपरस्टार बनवण्यासाठी त्यांचा भाऊ बोनी कपूर यांनी सर्व आधीच प्लॅन केले होते.
त्याकाळी कुठल्याही मोठ्या अभिनेत्रीं सोबत चित्रपट करण्याची वेळ यायची तेव्हा बोनी कपूर या चित्रपटातील अभिनेता म्हणून स्वतःचा भाऊ अनिल कपूर चे नाव फायनल करायचे. बोनी कपूर यांनी श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांसारख्या मोठ्या आणि टॉपच्या हिरोइन सोबत अनिल कपूरची जोडी सेट केली होती. विशेष म्हणजे मोठ्या पडद्यावर सुद्धा या जोड्या सुपरहिट ठरल्या. त्यामुळे माधुरी आणि सनी केवळ एकाच चित्रपटांमध्ये दिसण्यामागे हे देखील कारण ठरू शकते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !