जेव्हा सोनाक्षी सिन्हाला म्हंटले जाऊ लागले रीना रॉय यांची मुलगी, यावर अभिनेत्रीने दिले हे परखड उत्तर !

111

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री या एकमेकींस सारख्या दिसतात. त्यामुळे अनेकदा त्या एकमेकांच्या नातेवाईक तर नाही ना असा संभ्रम प्रेक्षकांमध्ये निर्माण होतो. लोगो असाच एक संभ्रम सोनाक्षी सिन्हा च्या बाबतीत सुद्धा झाला होता. त्याचे झाले असे की, ७० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय ही एकेकाळची टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिल्यामुळे त्यांचे नाव प्रसिद्धीच्या शिखरावर चढले होते.

या दरम्यान त्यांनी अनेक चित्रपट शत्रुघ्न सिन्हा सोबत सुद्धा केले. त्याकाळी रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या अफेअरच्या चर्चा खूप व्हायचा. असे म्हटले जाते की कालीचरण या चित्रपटापासून रीना आणि शत्रुघ्न यांची लव स्टोरी सुरू झाली होती. या दोघांच्या जोडीने तब्बल अकरा हिट चित्रपट दिले.

मात्र रिना आणि शत्रुघ्न यांच्या प्रेमाला योग्य वाट मिळाली नाही आणि हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम सिन्हा सोबत लग्न केले. या दोघांना एक मुलगी झाली तिचे नाव सोनाक्षी सिन्हा. मात्र अनेकदा सोनाक्षीला रिना रॉय यांची मुलगी म्हटले जाते.

ज्यावेळी सोनाक्षीने दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्यावेळी तिला पाहता क्षणी काहींच्या मनात रीना रॉय यांची आठवण झाली. मीडियामध्ये सोनाक्षीला रीना यांची मुलगी असल्याच्या बातम्या छापल्या जाऊ लागल्या. यामागचे मुख्य कारण म्हणजे लग्नानंतर सुद्धा शत्रुघ्न सिन्हा रीना यांना डेट करत होते.

जेव्हा सोनाक्षीला याबाबत विचारले गेले तेव्हा ती खूप नाराज झाली होती. तिने मीडियाला खूप खडे बोल सुनावले. तर रीना रॉय यांनीसुद्धा याबाबतीत मोठा खुलासा केला. जेव्हा रीना यांना हा प्रश्न विचारला गेला तेव्हा एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितले की सोनाक्षी माझ्यासारखी नव्हे तर ती तिच्या आई सारखी दिसते.

जेव्हा मी जखमी या चित्रपटात काम केले त्या वेळेस मला लोकांनी आशा पारेख आणि नासिर हुसेन यांची मुलगी असल्याचे म्हटले होते. तर डिंपल कपाडियाला नर्गिस यांची मुलगी म्हटले जात होते. त्यामुळे ही गोष्ट बॉलिवूडमध्ये काही नवी नाही. अशा अनेक चर्चा बॉलिवूडमध्ये होतात व कालांतराने त्या संपून देखील जातात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !