इंडस्ट्रीमधलं क्युट कपल म्हणुन अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्नाला ओळखले जाते. अक्षय कुमारचे सासरे राजेश खन्ना आणि ट्विंकल खन्नाचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. याबाबतीत आठवणींना उजाळा देत ट्विंकलने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट टाकली. तुम्हाला माहित आहे का की, अक्षय कुमारची सासु डिंपल कपाडियाने वयाच्या केवळ १६ व्या वर्षी राजेश खन्ना यांच्याशी लग्न करुन स्वत:च्या करियरला पुर्णविराम दिला होता.

त्यानंतर त्या संसारात रमल्या मात्र त्यांच्यात व राजेश खन्ना मध्ये काहीतरी बिनसले त्यामुळे ते दोघे वेगळे राहु लागले. वेगळे झाल्यावर डिंपल यांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केली. तुम्हाला माहित आहे का की, अक्षय कुमार व त्याची सासु डिंपल कपाडिया यांच्यात केवळ १० वर्षांचे अंतर आहे. यामुळेच या दोघांमध्ये सासू- जावयाच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते अधिक आहे.

या दोघांमध्ये एक घट्ट नाते आहे. मात्र या दोघांमध्ये अशी एक गोष्ट आहे जी खुप कमी लोकांना ठाऊक आहे. ती म्हणजे अक्षयला स्वत:चा जावई बनवण्यापुर्वी त्या अक्षयला गे समजायच्या. ही गोष्ट ऐकुन अक्षयसोबत अनेक लोक शॉक झाले होते.

त्याचे झाले असे कि एकदा करण जोहरच्या चॅट शोमध्ये अक्षय आणि ट्विंकल दोघे पोहचले होते. त्यावेळी या दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यावेळी ट्विंकल यांनी अक्षयशी संबंधित एक मोठे राज खोलले. ट्विंकलने त्यांच्या लग्नाबाबतीत मोठा खुलासा केला होता की तिची आई तिच्या नवऱ्याला म्हणजेच अक्षयला गे समजायची.

त्यांच्या एका जर्नलिस्ट फ्रेंडने अक्षय गे असल्याचे त्यांना सांगितले होते त्यामुळे त्यांना हा गैरसमज झाला होता. ट्विंकलने सांगितले की यानंतर तिच्या आईने अक्षयवर बारिक लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. एनढेच नव्हे तर अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नानंतर डिंपल यांनी अक्षय मुलं जन्माला घालण्यास सक्षम आहे का याची खात्री करुन घेण्यासाठी त्याची जेनेटिक टेस्टसुद्धा करयला लावली होती.

आपली सासू आपल्याला गे समजते आणि आपल्याला खरे प्रुव्ह करण्यासाठी जेनेटिक टेस्ट करायला लावते या गोष्टीची अक्षयला खुप राग आला होता. मात्र कुंडली तापसण्यापेक्षा जेनेटिक टेस्ट करणे कधीही उत्तम अशी अक्षयची विचारधारा असल्यामुळे तो शांत बसला. अक्षयने सांगितले की एक काळ असा होता कि मी त्यांच्यासोबत पुर्ण रात्र त्यांच्या मुलीबाबत म्हणजे डिंपल बद्दल बोलत होतो.

एवढेच नव्हे तर ट्विंकलशी लग्न झाले नसते तर त्याने डिंपल यांना डेट केले असते असे सुद्धा सांगितले. जेव्हा अक्षय डिंपलकडे त्यांच्या मुलीचा हात मागितला होता त्यावेळी डिंपल यांनी एक अट घातली होती. त्यांची अशी इच्छा होती की ट्विंकल आणि अक्षयने एक वर्ष लिव्ह इन मध्ये रहावे. एकमेकांनी नीट समजुन घ्यावे. त्यानंतरच लग्नबाबतचा निर्णय घेतला जाईल. सरतेशेवटी डिंपल यांनी अक्षय जावई म्हणुन पसंत पडला आणि २००१ मध्ये त्याचे व ट्विंकलचे लग्न झाले. या दोघांना आता आरव आणि नितारा ही दोन मुले आहेत.

अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा सूर्यवंशी, बच्चन पांडे, पृथ्वीराज, बेल बॉटम, अतरंगी रे, रक्षाबंधन यांसारखे चित्रपट रिलिज होणार आहे. अक्षयच्या सासुबाई अजुनही इंडस्ट्रीमध्ये अॅक्टीव्ह असुन त्याच्या पत्नीने मात्र अभिनय करणे सोडले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *