टीव्ही इंडस्ट्री बद्दल बोलायचे झाल्यास सोनी टीव्हीवर अनेक वर्ष चालणाऱ्या सी आय डी या मालिकेचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. इतकी वर्षे उलटून गेली तरीही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांचे अगदीच आवडते झाले होते.

आज आम्ही तुम्हाला या मालिकेतील एका अशा पात्राबद्दल सांगणार आहोत ज्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. आम्ही ज्या पात्राबद्दल बोलत आहोत ते म्हणजे ए सी पी प्रद्युमन. ए सी पी प्रद्युमन यांचे खरे नाव शिवाजी साटम असून ते एक मराठमोळा अभिनेता आहेत. शिवाजी साटम यांनी केवळ टीव्ही मालिकांमध्येच नव्हे अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे.
शिवाजी साटम यांना एक मुलगा आहे आणि अभिनयाच्या बाबतीत तो सुद्धा शिवाजी साटम यांच्यापेक्षा कमी नाही हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे. शिवाजी साटम यांच्या मुलाने सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तुम्हीसुद्धा त्याला अनेकदा मोठ्या पडद्यावर पाहिले असेल.

शिवाजी साटम यांच्या मुलाचे नाव अभिजित साटम असे आहे. खरे तर शिवाजी साटम हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांच्या परिवारा बाबत बोलणे जास्त पसंत करत नाहीत. त्यामुळेच बर्‍याच जणांना त्यांचा मुलगा फिल्म मध्ये काम करतो हे फारसे ठाऊक नाही. चला तर मग आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे त्यांच्या मुलाबद्दल थोडी माहिती देतो.
शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजित साटम हा अभिनेत्यासोबतच एक निर्माता आणि दिग्दर्शक सुद्धा आहे. त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून तो मराठी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. याव्यतिरिक्त त्याने अनेक मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

त्यामुळे शिवाजी साटम हे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये जितके प्रसिद्ध आहेत तितकाच त्यांचा मुलगा मराठी चित्रपटांमध्ये सक्रिय आहे असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही.
अभिजित साटम ची त्याच्या अभिनयामुळे अनेकदा प्रशंसा केली गेली आहे. पिता पुत्राची ही जोडी फारच कमी वेळा एकत्र पाहण्यास मिळते. शिवाजी साटम यांची सून आणि अभिजीत साटम यांची पत्नी मधुरा वेलणकर ही सुद्धा मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेत्री आहे. शिवाय ती अभिनयाच्या कार्यशाळा सुद्धा चालवत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *