बॉलिवुडची सर्वगुण संपन्न अभिनेत्री म्हणुन विद्या बालनला ओळखले जाते. विद्या बालनचा प्रत्येक चित्रपट हा वेगवेगळ्या भुमिकांचा असतो. त्यामुळे तिचे सर्वच चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट होतात. विद्या बालनच्या चाहत्यांची यादी ही केवळ भारतापुरतीच मर्यादित नसुन संपुर्ण जगभरात आहे. पण विद्या सोबत संसार थाटण्याची मनोमन इच्छा असणाऱ्यांना एक गोष्ट सलते ती म्हणजे विद्या विवाहीत आहे. विद्या बालन आता ४२ वर्षांची झाली आहे. तिचा जन्म १९७९ मुंबईत झाला.

विद्याने प्रसिद्ध चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपुरसोबत लग्न केले. 14 डिसेंबर २०१२ ला विद्याने सिद्धार्थ सोबत लग्न केले होते. त्यांचे लग्न मुंबइतील ग्रीन गिफ्ट बंगल्यात झाले होते. हे लग्न म्हणजे एक प्राइवेट सेरेमनी होती. ज्यात या दोघांच्या परिवारातील काही माणसं आणि त्यांच्या जवळील मित्रपरिवार एवढेच लोक उपस्थित होते. विद्या आणि सिद्धार्थची पहिली ओळख फिल्मफेअर अवॉर्ड शोच्या बॅकस्टेजला झाली होती. हे दोघे करण जोहरचे कॉमन मित्र असल्यामुळे त्यानंतर करण जोहरने पुन्हा या दोघांची भेट घडवुन आणली.

या दोघांची भेट होण्या पुर्वी दोघेही फिल्मइंडस्ट्रीमध्ये खुप प्रसिद्ध होते. त्यामुळे ते आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांची भेट होत नव्हती. मात्र त्यांच्यात बोलणे खुप व्हायचे. त्यामुळे हळुहळु त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. त्यानंतर एके दिवशी सिद्धार्थने विद्याला लग्नाची मागणी घातली. आणि मग परिवाराच्या संमतीने या दोघांनी तमिळ आणि पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न केले.

विद्या बालन ही सिद्धार्थ रॉय कपूरची तिसरी पत्नी आहे. सिद्धार्थने पहिले लग्न त्यांची बालमैत्रिण आरती बजाज सोबत केले. तिच्यापासुन सिद्धार्थला एक मुलगा आहे. त्यानंतर सिद्धार्थने दुसरे लग्न टिव्ही प्रोड्युसर कवितासोबत केले मात्र ते लग्न जास्त काळ टिकले नाही.

विद्याने सांगितले कि, जेव्हा ती सिद्धार्थच्या प्रेमात पडली तेव्हा तिच्या कल्पने पलिकडल्या प्रेमाची जाणीव तिला झाली. मी ज्याचा विचार केला होता त्याहुन कित्येकपटीने सुंदर प्रेम मला मिळाले. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्या व्यक्तीने जर कुठल्याही अटी किंवा कंडीशन्स न घालता आपल्याला एक्सेप्ट केले तर ही गोष्ट कुठल्या सेलिब्रेशन पेक्षा कमी नसते.

एखादी व्यक्ती तुम्हाला तुम्ही आहात तसे एक्सेप्ट केले तर त्याहुन चांगली गोष्ट कुठली असुच शकत नाही. खऱ्या प्रेमात कोणत्याही अटी असु नये असे मला वाटते आणि ही गोष्ट मला माझ्या प्रेमात मिळाली. प्रेम ही दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी एकत्र आयुष्य घालवण्याची प्रोसेस आहे. आज मला विचाराल तर प्रेम म्हणजे शेअर करणे, एक्सेप्ट करणे, एकमेकांना समजुन घेणे, आणि काळजी घेणे.

विद्या बालनचे पती सिद्धार्थ रॉय़ कपुर हे वॉल्ट डिज्नी इंडीयाचे मॅनिजींग डायरेक्टर आहेत. ते अभ्यासात खुप हुशार होते. त्यांनी मुंबईतील सिड्नम कॉलेज मधुन कॉमर्स विभागातुन शिक्षण घेतले आहे. त्यानंतर जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट स्टडीज मधुन एमबीएचे शिक्षण घेतले. विद्याचे दिर आदित्य रॉय कपूर आणि कुणाल रॉय कपूर हे दोघे बॉलिवुड कलाकार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *