सोनी सब वरील अतिशय लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेमधील सर्वच कलाकार अगदी लोकप्रिय आहेत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच कलाकार ओकांच्या अगदी पसंतीस पडले आहेत. एवढंच नव्हे तर त्यांची गोकुळधाम सोसायटी देखील लोकप्रिय झाली आहे. विविध धर्माची कुटुंब ही एकत्र त्या सोसायटीमध्ये राहतात आणि त्यांच्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींवर ही मालिका आहे.
या गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी म्हणजे आत्माराम तुकाराम भिडे आहेत. हे पात्र नेहमी स्वतःच एक बजेट बनवून, त्याच बजेटप्रमाणे चालत असते. जर का एखादी गोष्ट त्यांच्या बजेटच्या बाहेर गेली कि प्रचंड टेन्शनमध्ये येतं. सोबतच या मालिकेमध्ये ते एक ट्युशन टीचर देखील आहेत. या मालिकेमध्ये त्यांची दाखवलेली पत्नी माधवी भिडे आहे. व मुलीचं नाव सोनू आहे.
आत्माराम भिडे यांची पत्नी आपल्या नवऱ्याला व घराला मदत म्हणून लोणचं-पापड याचा छोटस स्वतःचा बिझनेस करते. माधवी भिडे यांचं खरं नावं सोनालीका जोशी आहे. ज्याप्रमाणे त्या या मालिकेमध्ये लोणचे पापडाचा छोटेखानी बिझनेस करतात त्याचप्रमाणे या खऱ्या आयुष्यात देखील त्या बिझनेस करतात.
मालिकेमध्ये त्या घर चालवण्यासाठी छोटेखानी बिझनेस करतात पण प्रत्यक्ष आयुष्यात त्या अभिनयाव्यतिरिक्त स्वतःच्या बिझनेस मधून करोडो रुपये कमवतात.
सोनालीका जोशी या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेशी तब्बल १२ वर्षे काम करत आहेत. त्यामुळे तिथून ही त्यांना योग्य तितके मानधन मिळते. पण सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनयाव्यतिरिक्त सोनालीने यांचा स्वतःचा बिझनेस आहे व त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात मोबदला मिळतो. सोनालीका जोशी यांनी फॅशन डिझाईनिंगमध्ये बी ए. केलं आहे आणि यातूनच त्यांना इतरत्र मोबदला मिळतो.
सोनालीका यांना तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या एका भागाचे २५ हजार इतके मानधन मिळते. त्यांना अभिनयाची आवड असल्याने त्यांनी थिएटर देखील केले आहे. फॅशन डिझाईनिंगचा कोर्स केल्याने त्यातून देखील त्यांना मोबदला मिळतो. याव्यतिरिक्त सोनालिका यांना फिरण्याची, वेगवेगळ्या स्थळांना भेटी देण्याची फार आवड आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !